Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित : सोमनाथ दळवी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 November 2025, 16:59

Pune News: लोणी काळभोर, ता. 26 : भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून लोकशाहीचा आत्मा आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसचे प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मुल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. संविधानामुळे (constitution) लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित आहेत, असे प्रतिपदान प्रमुख वक्ते सोमराज दळवी यांनी केले आहे.

 

हेही वाचा- “आता तो माझा नवरा आहे, तू तुझं…” नवऱ्याने सवत घरात आणून बसवली; बायकोला त्रास असह्य अन् नंतर जे घडलं ते…

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात बुधवारी (ता. 26 ) साजरा करण्यात आला. यावेळी सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथील 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्व श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन वक्ते सोमराज दळवी यांनी केले आहे. यावेळी उपमुख्याध्यापक विलास शिंदे, ज्येष्ठ शिक्षक शशिराव शेंडगे, शर्मिला साळुंखे, महिला पोलीस वनिता पाटील, सुवर्णा केंद्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्राचार्य सीताराम गवळी म्हणाले, “देशाचे संविधान आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची सर्वांना माहिती व्हावी यादृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संविधानाची निर्मिती करायला एक मसुदा समितीची स्थापणा करण्यात आली होती. अनेक बैठका झाल्या चर्चासत्र घडुन आली त्यानंतर मसुदा समितीकडुन सादर करण्यात आलेला मसुदा संविधान सभेकडुन 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आला आहे.”

यावेळी बोलताना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस वनिता पाटील म्हणाल्या की, परकीय आक्रमण असो अथवा देशातील कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे असो. ते रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहे. पोलिसांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये घुसून अतिरेकांचा खात्मा केला होता. या हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीर मरण आले होते. वीर गती प्राप्त झालेल्या सर्व जवानांना अभिवादन करते. तसेच कायदा हा संविधानावर चालत आहे. संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहे. त्यामुळे आपण भारतीय नागरिक म्हणून संविधानातील मूल्य व तत्वांचे जतन करण्यासाठी कटिबध्द राहू या. असे आवाहन यावेळी वनिता पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, दयानंद जानराव यांनी संविधानाचे महत्त्व काव्यमय ओळींमध्ये गुंफून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून संविधानाची प्रतिज्ञा उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली. शिस्त, देशभक्ती आणि संविधानाबद्दलची निष्ठा या त्रिवेणीची अनुभूती देत संविधान दिनाचा हा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद जानराव यांनी तर आभार अन्सर पिरजादे यांनी मानले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Gulabrao Patil

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी राजकारणातील 'गल्ली ते दिल्ली'चा प्रवास उलगडला; भुजबळ, राणें यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने चर्चा रंगली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.