Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune APMC: “पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सभापती प्रकाश जगताप यांची जहागिरी नाही”- संचालक प्रशांत काळभोर यांचा आरोप, मात्र प्रकाश जगताप यांनी सर्व आरोप फेटाळले..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 October 2025, 16:06
Zilla Parishad and Panchayat Samiti Reservation: Reservation for Zilla Parishad and Panchayat Samiti member posts will be released on October 13.

Photo- Pune Prime News

लोणी काळभोर, ता. 9: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Pune APMC) सभापती प्रकाश जगताप (Prakash Jagtap) हे मोजक्याच संचालकांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने कारभार हाकत आहेत. बाजार समिती (Pune Agricultural Produce Market Committee) ही प्रकाश जगताप यांची जहागिरी नाही. असा खोचक टोला संचालक प्रशांत काळभोर (Prashant Kalbhor) यांनी लगावला आहे. तसेच बाजार समितीतील नियमबाह्य पद्धतीने केलेल्या गैरकारभाराचा लवकरच पर्दाफाश करणार असून, याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व पणन मंत्री जयकुमार रावल यांना भेटून बाजार समितीत सुरू असलेल्या अनागोंदी कारभार व भ्रष्टाचारासंदर्भात माहिती देणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे.

नियमांनुसार वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यापूर्वी संचालक मंडळ सभा घेऊन त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख ठरवणे अपेक्षित होते. तसेच सभेमधील विषयावर चर्चा होणे आवश्यक असताना सभापती प्रकाश जगताप यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर केली.

संचालकांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आल्यानंतर वार्षिक अहवाल देण्यात आला. ही सरळ सरळ त्यांची मनमानी आहे. तसेच अहवालावर फोटो छपाई करताना तालुक्यातील व बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विद्यमान आमदार चेतन तुपे, आमदार बापूसाहेब पठारे यांचा विसर पडला आहे.

 

पूर परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला बाजार समितीच्या वतीने 50 लक्ष रुपये द्यावेत, असे मत संचालक रोहिदास उंद्रे यांनी वार्षिक सभेत मांडले होते. इतर ठिकाणी बाजार समितीच्या पैशाचा अपव्यय होत असताना, शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याऐवजी केवळ 25 लाख रुपयांचा निधी परस्पर दिला गेला. तसेच निधीचा चेक देताना कार्यक्षेत्रातील आमदार, पीडिसीसी बँकेचे संचालक, पॅनल प्रमुख, आधारस्तंभ व संचालक मंडळातील इतर सहकारी संचालकांना सोबत घेऊन चेक देणे आवश्यक होते.

दरम्यान, सभापती प्रकाश जगताप यांनी स्वतः श्रेय लाटण्यासाठी आणि पालकमंत्री अजितदादांसमोर आपली पाठ थोपटण्यासाठी कोणालाही सोबत न घेता स्वतः मदतीचा चेक देऊन आले आहेत. तसेच सभापती झाल्यावर दौंडचे आमदार राहुल कुल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन सत्कार करून घेतले. परंतु, मंत्रालयात मदतीचा चेक देताना त्यांनाही साधी कल्पना दिली नाही. तालुक्यामध्ये स्वतःची टिमकी मिरवण्यासाठी जाणीवपूर्वक मंत्री महोदय, आमदार व मान्यवर यांचा विसर पडल्याचे दाखवून दिले. त्यामुळे काम असेल तेव्हा आमदारांचे उंबरे झिझवायचे आणि काम झाल्यानंतर त्यांना ओळखसुद्धा द्यायची नाही. हे म्हणजे अंधारात कामे करून घ्यायचे आणि उजेडात स्वतःचा टेंभा मिरवायचा असे स्वार्थीपणाचे लक्षण आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा यशवंत सहकारी साखर कारखान्याचा जमीन खरेदीचा सामंजस्य करार (एम ओ यू) संचालक मंडळ सभे पुढे न घेता मोजक्याच संचालकांना हाताशी धरून करण्यात आला. बाजार समितीतील संचालकांना विश्वासात न घेता सभापतींचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. मनमानी पद्धतीने बाजार समिती चालवणे व संचालक मंडळाला विश्वासात न घेता कारभार करणे हे प्रकाश जगताप यांनी थांबविले पाहिजे. अन्यथा या नियमबाह्य पद्धतीने केलेल्या गैरकारभाराचा लवकरच पर्दाफाश करणार आहे असा इशारा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी दिला आहे.

प्रशांत काळभोर यांना उपसभापती होण्याची महत्वाकांक्षा असल्याने ते केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून वाटेल ते आरोप करत सुटले आहेत. मात्र या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मी गेल्या तीन महिन्यांपासून सभापती आहे. या आधी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. या कालावधीमध्ये संबंधितांनी कधीही आवाज उठवला नाही. याउपर बाजार समितीमध्ये प्रत्येक महिन्याला मासिक मिटिंग होत असते. या मिटिंगसाठी प्रशांत काळभोर हे उपस्थित असतात. मिटिंगमध्ये घेतले जाणारे सर्व निर्णय हे बहुमताने मंजूर केले जातात. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 25 लाखाचा निधी कार्योत्तर मंजुरीने दिला आहे. काळभोर यांनी केवळ आरोप करण्यापेक्षा ते पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावेत. त्यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून याला काडीचाही आधार नाही.

-प्रकाश जगताप (सभापती – कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50

सासवड पोलिसांची धडक कारवाई! ऑस्करवाडीतील बेकायदा हुक्का बारवर छापा, दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 17:46

भाड्याच्या घरात दोन थेरड्यांचं धक्कादायक कृत्य! तरुणींना फूस लावून आणायचे अन् शरीराचे लचके तोडायचे; शेजारचे तरुणीला वाचवायला धावले अन्…

Monday, 22 June 2026, 17:04
Next Post
Dhandekar vs Chandrakant Patil: 'We will beat up the blackmailer Dhandekar...', criticism of Chandrakant Patil is fierce, BJP is aggressive!

Dhandekar vs Chandrakant Patil: 'ब्लॅकमेलर धंगेकरांना ठोकून काढू...',चंद्रकांत पाटलांवरील टीका जिव्हारी, भाजपा आक्रमक!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.