Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खराडीतील ‘फिल टच स्पा’वर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, 74 हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोन महिलांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 8 September 2026, 14:52

पुणे, ता. 8 : खराडीतील सिटी व्हिस्टा बिल्डिंगमधील ‘फिल टच स्पा’वर खराडी पोलिसांनी सापळा रचून छापा 4 सप्टेंबरला टाकला. या छाप्यात पोलिसांनी एका महिलेची सुटका केली आहे. तर वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

राधिका हरीप्रसाद शर्मा (वय 38) व मनिषा विद्यानंद शिंदे (वय 54) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मिरा लक्ष्मण चव्हाण यांनी सरकारच्या वतीने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांना स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
बनावट ग्राहकाच्या माध्यमातून व्यवहाराची खातरजमा करून पोलिसांनी सायंकाळी साडेपाच ते पावणेसातच्या सुमारास छापा टाकला. बनावट ग्राहकाकडून 4 हजार रुपये घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर पोलिसांनी स्पाच्या कॅश काउंटरची पाहणी केली असता, सापळ्यापूर्वी दिलेल्या नोटांच्या क्रमांकांशी जुळणाऱ्या 500 रुपयांच्या आठ नोटा मिळून आल्या. तसेच काउंटरमधून आणखी 18 हजार 500 रुपये रोख जप्त करण्यात आले.

या छाप्यादरम्यान एका मसाज रूममध्ये महिला आढळून आली. पोलिसांनी तिची सुटका करून तिला सुरक्षिततेसाठी ताब्यात घेतले. मसाजसाठी 1500 रुपये आणि अतिरिक्त सेवेसाठी 2 हजार ते 2 हजार 500 रुपये आकारले जात असल्याचे समोर आहे. स्पा मॅनेजर राधिका शर्मा हिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच, जागा मालकाच्या प्रतिनिधीने जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप करत मनिषा शिंदे यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, दोन मोबाईल, पेटीएम मशीन, सीसीटीव्ही डीव्हीआर, रेट कार्ड आणि कंडोमचे पाकीट असा एकूण 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण ई-साक्ष ॲपद्वारे करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. खराडी पोलिस ठाण्यात राधिका शर्मा व मनिषा शिंदे यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 तसेच भारतीय न्याय संहितेचे कलम 143, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘फक्त पाटील आडनावामुळे मला टार्गेट करता, साडी घातल्यावर कंबर तर दिसणारच’ गुन्हा दाखल झाल्यानंतर लावणी नृत्यांगना राधा पाटील आक्रमक

Tuesday, 8 September 2026, 15:36

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी

Tuesday, 8 September 2026, 15:35

पुणेकरांचा प्रवास होणार सुस्गाट! डिसेंबर २०३० पर्यंत कात्रजपर्यंत धावणार मेट्रो; महामेट्रोकडून स्वारगेट-कात्रज मार्गाचे मेगा प्लॅनिंग जाहीर

Tuesday, 8 September 2026, 15:17

पुणे हादरलं! टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; गांजा पिताना हटकल्याचा राग अन् हातपाय पकडून गळा चिरला, छातीत वार करत…

Tuesday, 8 September 2026, 15:01

पत्नीची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं; आता तिच्या शुगर डॅडीलाही मारणार; आरोपीची धमकी

Tuesday, 8 September 2026, 14:58

खराडीतील ‘फिल टच स्पा’वर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, 74 हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोन महिलांवर गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 14:52
Next Post

पत्नीची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं; आता तिच्या शुगर डॅडीलाही मारणार; आरोपीची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp