पुणे: भारतीयांसाठी सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून परंपरा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लग्नसमारंभ, सण आणि विविध शुभकार्यांमध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे दररोजच्या सोन्याच्या किमतीकडे ग्राहकांचे लक्ष असते. आज, 8 सप्टेंबर 2026 रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

आकडेवारीनुसार, सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर यांसह प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,55,350 रुपये प्रति 10 ग्रॅम, म्हणजेच 15,535 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,42,400 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,16,510 रुपये आहे.

हे दर मेकिंग चार्ज आणि GST वगळून आहेत. त्यामुळे दागिने खरेदी करताना अंतिम किंमत यापेक्षा अधिक असते. मेकिंग चार्ज आणि GSTचा समावेश केल्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा भाव सुमारे 1,64,273 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,34,406 रुपयांवर जातो.

गेल्या 3 दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किमतीत सुमारे 1,200 रुपयांची वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सोने 1,500 रुपयांनी महागले आहे. 4 ऑगस्टच्या तुलनेत भावात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झाली असून 1 जुलैच्या तुलनेत ही वाढ 15,000 रुपयांपर्यंत आहे.
दरम्यान, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,55,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदीचा भाव सलग 5 व्या दिवशी स्थिर असून महाराष्ट्र आणि दिल्लीत चांदी 2,50,000 रुपये प्रति किलो आहे. सोन्याचा भाव 1,54,000 रुपये, तर चांदी 2,41,366 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.






