Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांचा प्रवास होणार सुस्साट! डिसेंबर २०३० पर्यंत कात्रजपर्यंत धावणार मेट्रो; महामेट्रोकडून स्वारगेट-कात्रज मार्गाचे मेगा प्लॅनिंग जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 September 2026, 15:17

पुणे : दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेच्या कामाला लवकरच वेग येणार आहे. डिसेंबर 2030 पर्यंत स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याचे लक्ष्य महामेट्रोने ठेवले आहे. या मार्गामुळे दक्षिण पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

स्वारगेट ते कात्रज हा 5.46 किलोमीटर लांबीचा संपूर्ण भुयारी मेट्रो मार्ग असणार आहे. या मार्गावर मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज अशी पाच स्थानके उभारण्यात येणार आहेत. भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यासाठी चार टनेल बोरिंग मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यापैकी दोन अत्याधुनिक यंत्रे लवकरच पुण्यात दाखल होणार असून, त्यांची जोडणी आणि चाचण्या पूर्ण झाल्यानंतर खोदकामाला सुरुवात होईल.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या माहितीनुसार, एका यंत्राद्वारे दररोज सुमारे 10 मीटर बोगदा खोदण्याचे नियोजन आहे. मेट्रोची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी स्थानकांचे बांधकामही टप्प्याटप्प्याने न करता शक्य तितक्या प्रमाणात एकाच वेळी सुरू ठेवले जाणार आहे. कात्रज ते शनिवारवाडा परिसरातील जुन्या भुयारी दगडी जलवाहिन्यांमुळे या प्रकल्पाच्या कामात अडथळा येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो भक्ती-शक्ती आणि निगडीपर्यंत नेण्याचे कामही सुरू आहे. शिवाजीनगर स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या मेट्रो मार्गिकेच्या पुढील कामाला चालना दिली जाणार आहे. भविष्यात मेट्रोचे जाळे चाकण, कोंढवा, खडकवासला आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळापर्यंत विस्तारण्याचे नियोजन आहे.

 

पुणे आणि परिसरातील मेट्रो नेटवर्क सुमारे 240 किलोमीटरपर्यंत नेण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. तसेच नागरिकांचा खासगी वाहनांवरील वापर कमी करण्यासाठी मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी सामायिक रिक्षा सेवा सुरू करण्याबाबत रिक्षाचालक संघटनांशी चर्चा सुरू असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आरटीई शाळांच्या थकीत प्रतिपूर्तीवर हायकोर्टाचा बडगा; राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

Wednesday, 9 September 2026, 17:44

‘ते ५ लाख दिले होते’ लाचखोर API कृष्णा बाबर यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; ऐका पूर्ण संभाषण

Wednesday, 9 September 2026, 17:21

पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल;नेमकं काय घडलं?

Wednesday, 9 September 2026, 17:07

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!आता थेट सातबारा उताऱ्यावर होणार ‘हा’ महत्त्वाचा बदल,नवी व्यवस्था लागू

Wednesday, 9 September 2026, 16:45

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १२ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार; परिमंडळ २ पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 9 September 2026, 16:40

‘आठ दिवसांत जमीन नावावर कर नाहीतर…’ खेडमध्ये जमिनीच्या वादातून भावांमध्ये तुफान राडा; धमकी देत लोखंडी पाईपने मारहाण….

Wednesday, 9 September 2026, 15:57
Next Post

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp