Friday, March 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पंचनामा रुग्णसेवेचा! छातीत दुखण्यावर ‘अँजिओग्राफी’चा सल्ला; 12 हजारांचे बिल भरून रुग्ण बाहेर… दुसऱ्या दिवशी अवघ्या 5 रुपयांत उपचार..

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 March 2026, 18:51

लोणी काळभोर, ता. 21 : पूर्व हवेलीतील खासगी रुग्णालयांमधील उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छातीत दुखत असल्याने घाईघाईने मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या 37 वर्षीय रुग्णाला एकामागोमाग महागड्या चाचण्या सुचवून अखेर अँजिओग्राफीचा सल्ला देण्यात आला; मात्र दुसऱ्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात अवघ्या काही मिनिटांत त्याला पित्ताचा त्रास असल्याचे निदान होऊन तो पूर्णपणे बरा झाला आहे.

या घटनेतील रुग्णाला काही महिन्यांपूर्वी रात्री आठच्या सुमारास अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. घाबरलेल्या अवस्थेत त्याने पूर्व हवेलीतील एका नामांकित खासगी रुग्णालयात धाव घेतली. रिसेप्शनमध्ये केसपेपर काढल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली आणि लगेच विविध चाचण्यांची यादी हातात दिली.

डॉक्टरांच्या सूचनेनुसार परिचारिकेने तातडीने ईसीजी (ECG) काढला. रिपोर्टमध्ये काहीही गंभीर आढळले नाही. त्यानंतर टू डी इको (2D Echo) चाचणी करण्यात आली; त्यातही कोणताही दोष दिसून आला नाही. यावरही समाधान न मानता डॉक्टरांनी पुढे TMT (ट्रेडमिल टेस्ट) करण्यास सांगितले. छातीत दुखत असतानाही रुग्णाला 20 ते 25 मिनिटे मशीनवर धावायला लावण्यात आले. या चाचणीतही कोणताही आजार निदान झाला नाही.

सलग तीन चाचण्यांनंतरही काही निष्पन्न न झाल्याने डॉक्टरांनी पुढील पायरी म्हणून अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. रुग्णाने ती चाचणी दुसऱ्या दिवशी करण्याचे सांगितले; मात्रतोपर्यंत रुग्णालयाने 12 हजार रुपयांचे बिल त्याच्या हातात दिले होते. घाबरलेल्या अवस्थेत रुग्णाने बिल भरले आणि तेथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी रुग्णाने थेट लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथे अवघ्या 5 रुपयांचा केसपेपर काढून डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करताच छातीत दुखण्यामागे हृदयाचा नव्हे तर पित्ताचा त्रास असल्याचे स्पष्ट केले. तातडीने इंजेक्शन देण्यात आले आणि काही गोळ्या रुग्नालयातूनच मोफत दिल्या. अवघ्या अर्ध्या तासात रुग्ण पूर्णपणे बरा झाला आणि त्यानंतर त्याला पुन्हा कधीच छातीत दुखण्याचा त्रास झाला नाही.

दरम्यान, या घटनेमुळे खासगी रुग्णालयांमधील चाचणी पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एका साध्या पित्ताच्या त्रासासाठी रुग्णाला महागड्या हृदयाच्या चाचण्यांच्या फेऱ्यात टाकण्यात आले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सेकंड ओपिनियन नक्की घ्या
या प्रकरणामुळे रुग्णांनी कोणत्याही मोठ्या चाचण्या किंवा शस्त्रक्रियेपूर्वी किमान दोन ते तीन डॉक्टरांचा सल्ला घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. तसेच, कोणत्याही रुग्णालयाला विशिष्ट लॅबमधूनच चाचण्या करण्याची सक्ती करण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. रुग्णांना आपल्या सोयीप्रमाणे आणि परवडेल त्या ठिकाणी उपचार घेण्याचा अधिकार आहे.

रुग्णालयाकडून अन्याय झाला? तुमचा आवाज आम्हाला कळवा
रुग्णालय प्रशासनाकडून आपल्यावर अन्याय, अवाजवी बिलिंग किंवा सक्तीच्या चाचण्या लादल्या गेल्या असतील, तर आपण पुणे प्राईम न्यूजकडे लेखी किंवा व्हिडिओ स्वरूपात आपली हकीकत पाठवू शकता. तपासून पाहिल्यानंतर संबंधित रुग्णालयाचे नाव व प्रकरण वृत्तपत्रातून प्रसिद्ध करून नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम पुणे प्राईम न्यूज करणार आहे. सत्य मांडण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पुणे प्राईम न्यूज हे वृत्तपत्र तुमचे विश्वासाचे माध्यम आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ashok kharat

Ashok Kharat : “पतीच्या जीवाचे भय दाखवून सात वर्षे अत्याचार”; नाशिकच्या पीडितेने फाडली भोंदूगिरीची ‘फाईल’

Friday, 20 March 2026, 19:13
Karuna Munde: 'My husband Dhananjay Munde used to do black magic, he also did it with Ashok Kharat...' Karuna Munde's statement creates a stir

Karuna Munde: ‘माझा नवरा धनंजय मुंडे काळी जादू करायचा, तोपण अशोक खरातच्या…’ करुणा मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

Friday, 20 March 2026, 18:58

पंचनामा रुग्णसेवेचा! छातीत दुखण्यावर ‘अँजिओग्राफी’चा सल्ला; 12 हजारांचे बिल भरून रुग्ण बाहेर… दुसऱ्या दिवशी अवघ्या 5 रुपयांत उपचार..

Friday, 20 March 2026, 18:51
Bhor

Bhor : मंदिरातील बैठकीत वाद चिघळला; धक्काबुक्की दरम्यान बंदूक खाली पडल्याने खळबळ

Friday, 20 March 2026, 18:47
Haveli News: Black market for gas cylinders is flourishing in East Haveli; When will action be taken against the gang selling commercial cylinders for Rs 7,000?

Haveli News: पूर्व हवेलीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार बहरात; व्यावसायिक सिलेंडर 7 हजारांनी विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई कधी?

Friday, 20 March 2026, 18:40
Purandar News: Agriculture officer caught taking bribe in Purandar! The "game" of the officer who looted the farmer failed; ACB takes action

Purandar News: पुरंदरमध्ये कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना बेड्या! शेतकऱ्याची लूट करणाऱ्या अधिकाऱ्याचा “गेम” फसला; ‘एसीबी’ची कारवाई

Friday, 20 March 2026, 18:17
Next Post
Karuna Munde: 'My husband Dhananjay Munde used to do black magic, he also did it with Ashok Kharat...' Karuna Munde's statement creates a stir

Karuna Munde: 'माझा नवरा धनंजय मुंडे काळी जादू करायचा, तोपण अशोक खरातच्या...' करुणा मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.