यवत: पंचायत समिती सभापती पदाकरिता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (District Collector Jitendra Dudi) यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा परिषद क्षेत्रातील 13 पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti Reservation) सभापती पदांची उद्या आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. उद्या 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता, बहुउद्देशीय सभागृह, 5 वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.

सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2025 तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.








