Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्रामीण शिवारातून राज्य सेवेकडे वाटचाल; झारगडवाडी येथील दीपाली निकम यांची कृषी अधिकारीपदी निवड   

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 February 2026, 16:13

गोरख जाधव 

 

डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील दीपाली विजयकुमार निकम हिने ग्रामीण पार्श्वभूमीवरून स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्य सेवेत झेप घेतली आहे.  ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ मार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा स्पर्धा परीक्षेत राज्यात 49 वा क्रमांक मिळवत तिची कृषी अधिकारीपदी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे झारगडवाडी गावासह बारामती तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम निकालानुसार, दीपालीने पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे तिन्ही टप्पे यशस्वीरीत्या पार केले. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी मार्गदर्शनाविना केवळ स्वअभ्यासाच्या बळावर तिने हे यश मिळवले. दररोज 10 ते 12 तासांचा नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि जिद्द हे तिच्या यशामागील प्रमुख घटक ठरले.

दीपालीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, झारगडवाडी येथे झाले. माध्यमिक शिक्षणासाठी तिने बारामतीतील एम. एस. सो. विद्यालयात प्रवेश घेतला. पुढे विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयातून बारावी पूर्ण केल्यानंतर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथून तिने कृषी पदवी प्राप्त केली. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे वनस्पती रोगशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

वडील विजयकुमार निकम हे शेतकरी तर आई गृहिणी आहेत. लहानपणापासून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या दीपालीने कुटुंबाच्या पाठिंब्याने आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे ध्येय साध्य केले. ग्रामीण भागातून येत स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

तिच्या यशाबद्दल झारगडवाडी ग्रामस्थांनी सत्कार करून अभिनंदनाचा वर्षाव केला. फटाक्यांची आतिषबाजी करत गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.

शेतकऱ्यांसाठी काम करण्याची बांधिलकी

“मी याच शिवारात वाढले. शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहिले आहेत. त्यामुळे कृषी अधिकारी म्हणून काम करताना माझे पहिले प्राधान्य आपल्या मातीला आणि शेतकऱ्याला असेल. शासनाच्या विविध कृषी योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,” अशी भावना दीपाली निकम हिने व्यक्त केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

"टिपू सुलतान शिवाजी महाराजांच्या समकक्ष"- हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने राजकारण तापलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.