Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरीत मध्यरात्री मोठी चोरी! 8.50 लाखांचा पाण्याचा टँकर पळवला, GPS बंद करून चोरटे पसार

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 November 2026, 11:14

मांजरी, ता.3 : मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील विजयविहार कॉलनी परिसरातून तब्बल 8 लाख 50 हजार रुपये किमतीचा पाण्याचा टँकर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पार्क केलेला टँकर पळवून नेल्यानंतर त्याचे जीपीएस कनेक्शनही बंद केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मांजरी पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी टँकरमालक नितीन यशवंतराव शिवरकर (वय 64, रा. रास्ता पेठ, पुणे) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरकर यांचा पुणे महानगरपालिकेला पाण्याचे टँकर पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा टाटा कंपनीचा 10 हजार लिटर क्षमतेचा टँकर (क्रमांक एमएच 03 सीपी 4271) मांजरी येथील चालक प्रसाद भालगे याच्याकडे होता. भालगे याने 30 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विजयविहार कॉलनी, घुले कॉलनी लेन क्रमांक 1, वरद हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत टँकर पार्क केला होता.

दरम्यान, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता चालक कामावर जाण्यासाठी आला असता, पार्क केलेल्या जागेवर टँकर दिसून आला नाही. त्यानंतर टँकरमालकाने GPS लोकेशन तपासले असता, पहाटे 3 वाजून 22 मिनिटांनी टँकर त्या जागेवरून निघाल्याची नोंद आढळली. विशेष म्हणजे, पहाटे 4 वाजून 2 मिनिटांनी जीपीएस GPS कनेक्शन बंद झाल्याचेही निदर्शनास आले.

टँकरचा परिसरात शोध घेऊनही तो मिळून न आल्याने अखेर मालकाने मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?सप्टेंबरचा हप्ता मिळाला,ऑक्टोबरच्या 1500 हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर..

Saturday, 7 November 2026, 18:42

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई! फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता ताब्यात, ८.८६ किलो गांजा जप्त

Saturday, 7 November 2026, 17:50
Next Post

दौंडमधील धक्कादायक प्रकार! तिचे फोटो अपलोड केले, तिच्याच नावाने दुसऱ्याशी केली अश्लील चॅटिंग; एकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp