Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: गांजा विकणारा सराईत गुन्हेगार 2 वर्षांसाठी तडीपार; लोणीकाळभोर पोलिसांची कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 February 2026, 0:42
Loni Kalbhor News: Innkeeper selling ganja, criminal deported for 2 years; Loni Kalbhor police take action

लोणी काळभोर : शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात सुरू (Loni Kalbhor News) असलेल्या मोहिमेत लोणीकाळभोर पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला 2 वर्षांसाठी पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार केले आहे. ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ड्रग्स, गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर आणि परिणामकारक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी आकाश संतोष भाले, वय 23 वर्षे, रा. गाडेवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

आकाश भाले याच्याविरोधात यापूर्वी अमली पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हे नोंद असून, त्याच्यासोबत त्याची आई मंगल संतोष भाले, वय 26 वर्षे, हिच्यावरही गांजा विक्रीसंदर्भात कारवाई करण्यात आली होती. आरोपींच्या कारवायांमुळे परिसरातील सामान्य नागरिक, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाऊन आर्थिक व सामाजिक नुकसान होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पळके यांनी विशेष प्रस्ताव तयार करून आरोपीविरुद्ध तडीपारीची कार्यवाही करण्याबाबत उपायुक्तांकडे सादर केला होता.

पोलीस उपायुक्त परिमंडळ 6, मा. डॉ. राजकुमार शिंदे यांनी प्रकरणाचा आढावा घेत आरोपी आकाश संतोष भाले व मंगल संतोष भाले यांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग मा. अनुराधा उदळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप, पोलीस हवालदार सुनील नागाळे, पो.हवा. तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसळे, दीपक सोनवणे तसेच महिला पोलीस अंमलदार योगिता भोसले यांनी सहभाग घेतला. लोणीकाळभोर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

Bhigwan News: “कायद्याची कसोटी की जनतेचा दबाव?” भिगवणमध्ये मुलीच्या प्रकरणावरून उसळला जनआक्रोश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.