Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी काळभोरची ‘गोल्डन गर्ल’ प्रिशा बोनुटे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये जगात पहिली

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 March 2026, 11:04

लोणी काळभोर, ता. 14 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील (Loni Kalbhor) द टायग्रिष स्कूलच्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी प्रिशा बोनुटे हिने आंतरराष्ट्रीय संगणक विज्ञान ऑलिंपियाड या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. अत्यंत कमी वयात मिळवलेले हे यश शाळेसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.

 

प्रिशाने या स्पर्धेत 100 टक्के गुण मिळवत तब्बल 99.63 टक्के परसेंटाईल मिळवला. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने शाळा स्तर, झोनल स्तर, प्रादेशिक स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तर अशा सर्व टप्प्यांमध्ये अव्वल स्थान पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संगणक विज्ञान विषयातील तिची अचूक समज, वेगवान विचारशक्ती आणि तर्कशुद्ध उत्तरांमुळे तिने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.

या भव्य यशाबद्दल प्रिशाला इंटरनॅशनल गोल्ड मेडल, गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन, सर्टिफिकेट ऑफ आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन तसेच 1हजार किमतीच्या भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आहे. एवढ्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा फडकवणाऱ्या प्रिशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रिशाच्या या यशाबद्दल द टायग्रिष स्कूलचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि तिच्या पालकांनी आनंद व्यक्त करत तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम, ऑलिम्पियाड प्रशिक्षण आणि आधुनिक शिक्षणपद्धतीचा वापर केला जातो. याच सकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

प्रिशाच्या या उज्ज्वल यशामुळे लोणी काळभोर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शैक्षणिक क्षेत्रात द टायग्रिष स्कूलचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उज्ज्वल झाले आहे. परिसरातील नागरिक, पालकवर्ग आणि शिक्षणप्रेमींनी प्रिशाचे अभिनंदन करत तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, अत्यंत लहान वयात मिळवलेले हे आंतरराष्ट्रीय यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असून “मेहनत, जिज्ञासा आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतीही उंची गाठता येते,” हे प्रिशाने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Yawat

Yawat : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना ; दोन दुचाकी, डंपरसह साडेबारा लाखांचा ऐवज लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.