Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना ; दोन दुचाकी, डंपरसह साडेबारा लाखांचा ऐवज लंपास

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 14 March 2026, 11:28
Yawat

photo- social media

Yawat : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढताना दिसत आहे. यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथील वकिलवस्ती परिसरात पहाटेच्या सुमारास धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घड्याळे, रोख रक्कम तसेच दोन मोटारसायकली आणि डंपरसह तब्बल 12 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (ता. 12) पहाटे साडेचार वाजता घडली.

 

या प्रकारामुळे वरवंड व परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमोल रमेश दिवेकर (वय-36, व्यवसाय शेती, रा. वरवंड वकिलवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल दिवेकरहे वकीलवस्ती येथे राहतात. गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या हॉलच्या खिडकीचे लोखंडी गज कशाच्या तरी सहाय्याने तोडले. त्या खिडकीवाटे चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटावर डल्ला मारला. यावेळी कपटाटील टायटन कंपनीची 4 मनगटी घड्याळे, रोख रक्कम 20 हजार रुपये ऐवज पळवला.

चोरट्यांनी गावातील इतर ठिकाणांवरही हात साफ केला. चंद्रकांत प्रभाकर काकडे यांच्या घरासमोरील हिरो होंडा सीडी डॉन (MH 16 W 8552) आणि कल्याण संजय कारंडे यांची हिरो होंडा सीडी डॉन (MH 42 6412) या दोन मोटारसायकली चोरून नेण्यात आल्या. तसेच MH 42 T 0920 क्रमांकाचा अंदाजे 12 लाख रुपयांचा सहा टायरचा डंपर आणि त्यामधील चार हजार रुपये किमतीचा मुरुम देखील चोरट्यांनी पळवून नेल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेत एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बीएनएस कलम 305, 303 (2), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच रात्री घरफोडी आणि तीन वाहने चोरीला गेल्यामुळे यवत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यवत पोलीस शोध घेत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Dound

Daund : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
pune

Pune : पुणे महसूल विभागात मोठी खळबळ! कलम 155 चा गैरवापर भोवला; 40 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Thursday, 9 April 2026, 17:40

भोरमध्ये निवडणुकीचा धुरळा! 43 जागांसाठी ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला; ‘या’ गावांमध्ये राजकीय संघर्ष पेटणार

Thursday, 9 April 2026, 17:38

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Next Post

धर्मांतर करायचे आहे? मग आधी द्यावी लागणार माहिती; राज्य सरकारचा नवा 'धर्मांतर बंदी' कायदा काय सांगतो? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.