Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : कदमवाकवस्ती येथे बंटी बबलीच्या जोडीने नकली सोने देऊन फायनान्स गोल्ड लोन कंपनीला लावला लाखोंचा चुना

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 November 2025, 19:51
loni kalbhor

photo - ppn

Loni Kalbhor  : बनावट सोने तारण ठेवून नवरा बायकोने मैग फायनान्स गोल्ड लोन या कंपनीला 1 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मैग फिनजवे व कंपनी येथे 1 मार्च 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Loni Kalbhor)

 

अम्रिन राजु शेख व तिचा पती राजु शेख (पुर्ण नाव नाही, दोघेही रा.लाईट डि पी जवळ, गल्ली नंबर १४, सर्वे नंबर 933, सय्यदनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नारायण भिमराव पंडीत (वय-34, रा.मु.पो. घांटग्रा ता. गंगाखेड जि.परभणी सध्या रा.श्री सिध्दीविनायक पार्क, वडकी ता.हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण पंडीत हे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मॅग फिनजर्वे व कंपनी येथे व्यवस्थापक म्हणून काम करतात. ते नोकरीतून मिळणाऱ्या पगारीतुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मॅग फिनजर्व व कंपनी हि सोनेतारण लोन करते. कंपनीमध्ये सोनेतारण ठेवून लोकांना लोन दिले जाते. कंपनीमध्ये काम करणारे लोकांना कंपनीमध्ये नोकरीस घेण्याचे अगोदर सोने पारख करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. लोकांना सोने तारण ठेवुन लोन देण्याचे अगोदर लोकांकडुन तारण ठेवण्यात येणारे सोन्याची पारख करुन त्याची तपासणी केली जाते.

तपासणीनंतर सोने खरे असल्याची खात्री पटल्यानंतर त्याचे वजन व मुल्यांकन करून तारण ठेवले जाते. तारण ठेवणाऱ्या लोकांकडून त्यांचे आधारकार्ड, पैनकार्ड व बँकेचे पासबुक अथवा चेक घेवुन सर्व कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतरच कंपनी त्यावर लोन देत असते. मॅग फिनजर्वे व कंपनीमध्ये अम्रिन व राजु शेख हे जोडपे एक सोन्याचे कडे तारण ठेवण्याकरीता आले होते. घरामध्ये आर्थिक अडचण असुन पैशांची खुप गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्याजवळ असलेल्या सोन्याच्या कड्याची पाहणी करुन कंपनीने सोने पारख करण्याचे दिलेल्या प्रशिक्षणावरुन स्टोनवर सदर सोन्याचे कडे घासले.

त्यानंतर अॉसिड व मिठ पाणी टाकुन चेक केले असता, सदर दागिना हा प्रथमदर्शनी सोन्याचा असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांना 1 लाख 90 हजार सोने तारण कर्ज देण्यात आले. परंतु, त्याची तपासणी केली असता, ४०.७४ ग्रॅम ऐवढे वजनाचे कड्यास सोन्याचा मुलामा दिलेली बनावट सोने असल्याचे समोर आले. दोन्ही आरोपींनी लोन घेवुन ते न फेडता सदर रक्कम स्वताच्या आर्थिक फायद्याकरिता वापरली आहे. दोघांनी कर्ज फेड न करता नकली सोने देऊन कंपनीची फसवणुक केली आहे. अशी तक्रार नारायण पंडीत यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Rupali Thombre: Big news..! Goodbye to Dada in Pune? BJP, Shiv Sena's offer? Rupali Thombre said....

Rupali Thombre: मोठी बातमी..! पुण्यात दादांना रामराम? भाजप, शिवसेनेची ऑफर? रुपाली ठोंबरे म्हणाल्या....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.