पुणे: पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगर परिषदेच्या )Jejuri Nagarparishad Election) निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या मतमोजणीत अजित पवार (Dilip Barbhai) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. जेजुरी नगर (Ajit Pawar) परिषदेवर राष्ट्रवादीने निर्विवाद (Pune Nagarparishad Election) वर्चस्व मिळवत सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी जयदीप दिलीप बारभाई यांची निवड झाली असून त्यांनी 3521 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. Pune Politics)

निवडणूक निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळत आणि फटाके फोडत विजय उत्सव साजरा केला. जेजुरी नगर परिषदेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत ही नगर परिषद काँग्रेस पक्षाकडे होती. मात्र 2025 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करत सत्ता मिळवली आहे. )Breaking News)

या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये थेट लढत पाहायला मिळाली. मात्र या लढतीत भाजपचा मोठा पराभव झाला असून भाजपचे केवळ 2 उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार तानाजी खोमणे यांनी देखील विजय मिळवला आहे. एकूण 20 नगरसेवकांपैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. 2025 ते 2030 या कालावधीसाठी जेजुरी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राहिले आहे. (Jejuri News)








