Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News: इंदापूर तालुक्यातून पती-पत्नी आठ दिवसांनंतरही बेपत्ता, देवदर्शनाचा बहाणा की काही वेगळेच? पोलिसांसमोर मोठे आव्हान

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 26 January 2026, 14:13

Indapur News : इंदापूर, ता. 25 : इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून आदमापूर येथे बाळुमामाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले तरुण पती-पत्नी तब्बल आठ दिवस उलटूनही अद्याप बेपत्ता (Missing) असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आकाश तुकाराम वाईकर (वय 28) व त्याची पत्नी निकीता आकाश वाईकर (वय 20) यांचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांसमोर शोधाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणी आकाशची आई संगिता तुकाराम वाईकर (वय 45, व्यवसाय – मजुरी, रा. बाभुळगाव) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश हा अकलुज येथील आर.बी.एल. प्रा. लि. फायनान्स कंपनीत कार्यरत आहे. दि. 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास संगिता वाईकर व त्यांचे पती मजुरीच्या कामासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी घरात आकाश व निकीता हे दोघेच उपस्थित होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आकाश याने आईला फोन करून “आम्ही दोघे आदमापूर येथे बाळुमामाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत,” असे सांगितले.

त्याच दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास आकाश याचा पुन्हा फोन आला. “आम्ही देवदर्शनासाठी निघालो आहोत, तुम्ही जेवण करून घ्या,” असे सांगून त्याने फोन बंद केला. मात्र, दुसऱ्या दिवशी 19 जानेवारीपासून आकाशचा मोबाईल क्रमांक सतत बंद लागत असल्याने कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली. दिवसभर प्रयत्न करूनही संपर्क न झाल्याने आकाश व निकीता हे दोघे आदमापूर येथे न जाता कुठेतरी अज्ञात ठिकाणी निघून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आठ दिवस उलटूनही कोणताही मागमूस न लागल्याने या प्रकरणाला संशयाचे गडद सावट आले आहे.

 

अखेर इंदापूर पोलीस ठाण्यात खबरी जबाब दाखल करण्यात आला असून पोलीस विविध दिशांनी तपास करत आहेत. नागरिकांनी या दाम्पत्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित इंदापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07
Next Post

Pune Viral Video: भररस्त्यात दहशत! पुण्याच्या मगरपट्ट्यात टोळक्याचा राडा; विक्रेत्याला मारहाण करत दुकान फोडलं, थरार कॅमेऱ्यात कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp