Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरीत दारूच्या नशेत दुचाकीस्वाराचा थेट पोलिसांशी पंगा! आधी रस्ता अडवला, मग पोलीस ठाण्यातही गोंधळ

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 November 2026, 11:27

मांजरी, ता. 23 : मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवत भररस्त्यात इतर वाहनचालकांना अडवून शिवीगाळ करण्याबरोबरच थेट पोलिसांच्या शासकीय वाहनालाच अडवून धिंगाणा घालण्याचा प्रकार मांजरी बुद्रुक येथे रविवारी (ता. 22) मध्यरात्री घडला. सुहास नागनाथ झाडे (वय 39, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून, त्याने मद्यप्राशन करून दिव्यांगांसाठी बदल करण्यात आलेल्या दुचाकीवरून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलची शनिवार (ता. 21) रात्रीपासून गस्त सुरू होती. रविवारी (ता. 22) मध्यरात्री एकच्या सुमारास बीट मार्शल पथक के. के. घुले चौकात पोहोचले. त्यावेळी सुहास झाडे हा मद्यप्राशन करून टीव्हीएस कंपनीची (एमएच 12 व्हीके 9018) दुचाकी बेदरकारपणे चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसमोर तो दुचाकी आडवी लावून वाहनचालकांना शिवीगाळ करीत होता.

दरम्यान, गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे हे शासकीय वाहनाने त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी झाडे याने आपली दुचाकी थेट शासकीय वाहनासमोर आडवी घातली. पोलिसांनी त्याला समजावून घरी जाण्यास सांगितले. मात्र, पोलिसांचे वाहन पुढे जाताच त्याने पुन्हा दुचाकी वेगाने चालवत शासकीय वाहनाच्या पुढे जाऊन रस्ता अडविला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.

यानंतर संबंधित व्यक्ती स्वतः दुचाकीवरून मांजरी पोलीस ठाण्यात आला. मात्र, तेथेही त्याचा गोंधळ सुरूच होता. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसमोर मोठमोठ्याने शिवीगाळ आणि आरडाओरडा करीत त्याने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु मद्याच्या नशेत तो वारंवार तोल जाऊन खाली पडत होता.

अखेर पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून रक्ताचे नमुने सिलबंद स्वरूपात घेण्यात आले आहेत. मद्यप्राशन करून सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे, इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांजरीत दारूच्या नशेत दुचाकीस्वाराचा थेट पोलिसांशी पंगा! आधी रस्ता अडवला, मग पोलीस ठाण्यातही गोंधळ

Monday, 23 November 2026, 11:27

तमाशा फडांची अवस्था बिकट; कलाकारांवर उपासमारीची वेळ? मोबाईलच्या सवयीमुळे महाराष्ट्राची पारंपरिक लोककला संकटात- पद्मश्री रघुवीर खेडकर

Monday, 23 November 2026, 11:13

Gold Rate: गेल्या आठवड्यात स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले; मुंबईसह प्रमुख शहरांतील दर किती? पहा

Monday, 23 November 2026, 11:04

लाडक्या बहिण योजनेचा खर्च पेलताना सरकारची दमछाक? राज्याच्या आर्थिक स्थितीवर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Monday, 23 November 2026, 10:42

Pune News: पुणे ग्रँड टूरपूर्वी रस्त्यांच्या कामांना वेग; 55 टक्के काम झाले पूर्ण

Monday, 23 November 2026, 10:01

Pune News: ऊस तोडताना अचानक बिबट्याचा हल्ला! मजुराने हातातील कोयत्याने दिली झुंज; थोडक्यात वाचले प्राण

Monday, 23 November 2026, 9:26
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp