खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात वाहतुक कोंडी व अपघाताच्या घटना सातत्याने वाढतच चाललेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एक-सप्रेस वेवर मिसिंग लिंक ही नवीमार्गिका होत आहे. ही मार्गिका ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुली होईल अशी माहिती देण्यात आले होती. मात्र, ताज्या अपडेटनुसार सर्व कामे पूर्ण होऊन डिसेंबर महिन्याच्या शेवटी मिसिंग लिंक मार्गिका खुली केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याचे अपडेट घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीची प्रकल्प आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक, पुणे रिंग या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना काही सूचना देखील दिल्या आहेत.

एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या कामातील व्हर्टिकल ब्रीजचे काम सध्या वेगात सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे, असेही उमुख्यमत्र्यांनी बैठकीत सांगितले आहे.

दरम्यान, या बैठकीत मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग सहा ऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात लाल आहे. जर असे झाले तर लोकांसाठी ते दिलासादायक असेल अशी चर्चा देखील यावेळी झाली.







