Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मित्राशी फोनवर बोलते म्हणून आईने केला खून; भावाने कापला गळा, खिशातल्या चिठ्ठीने फिरवला गेम!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 8 June 2025, 17:55

मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणाऱ्या आस्था उर्फ तनिष्का (वय 17) या विद्यार्थिनीचा तिच्या आईनेच गळा दाबून खून केला आणि नंतर तिच्या मामे भावांसह मृतदेहाची निर्घृण विल्हेवाट लावली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दादरी गावातील रहिवासी असलेल्या आस्थाचा बुधवारी (4 जून) दुपारी 1 वाजता तिच्या मित्राशी फोनवर संवाद सुरू होता. तेव्हा तिची आई राकेश देवीने रागाच्या भरात फोन हिसकावून घेतला. या गोष्टीवरून दोघींमध्ये वाद निर्माण झाला. वाद इतका वाढला की राकेश देवीने आस्थाचा गळा दाबून तिचा जीव घेतला. या घटनेनंतर राकेश देवीने आपल्या भावाला घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर मेहरौली गावातून तिचे मामा आणि चुलत भाऊ कारने दादरी येथे आले. त्यांनी मिळून मृतदेह नष्ट करण्याचा कट रचला. आस्थाचे शिर धारदार शस्त्राने कापून तिचा धड परतापूरच्या बहादूरपूर कालव्यात फेकून देण्यात आला.

आस्था ही सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या रमेश कुमार यांची मुलगी होती. ती 4 जूनपासून बेपत्ता होती. मात्र, कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. 5 जून रोजी सकाळी नाल्यात एका डोके नसलेल्या मृतदेहाचा शोध लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी मृतदेहाजवळील सलवारमध्ये सापडलेल्या एका कागदावर लिहिलेला मोबाईल क्रमांक पाहून आस्थाची ओळख पटवली. त्यानंतर तिच्या मित्राने देखील मृतदेह पाहून ओळख दिली. पोलिसांनी तात्काळ आस्थाच्या आईसह दोन्ही भावांना ताब्यात घेतलं. त्यानंतर मेहरौली गावात जाऊन तिचे मामा आणि चुलत भाऊ देखील अटक करण्यात आले. हत्येनंतर राकेश देवीने मुलगी बेपत्ता असल्याचे भासवत गावकऱ्यांसह शोध सुरू केला होता. मात्र पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवली नव्हती. जेव्हा पोलिस तपासासाठी गावात पोहोचले तेव्हाच सत्य उघडकीस आले.

 

आस्थाच्या हत्येसंबंधित महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींची वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून तिचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. तिचं शिर जानी गंगा कालव्यात फेकल्याची कबुली चुलत भाऊ मोनूने दिली असून, पोलिस पथक अद्याप शिराचा शोध घेत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17
Next Post

दुर्दैवी घटना! लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये दोन तरूणांचा बुडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp