Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हवेली पंचायत समिती कटिबद्ध! विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करणार – सभापती युवराज काकडे

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 October 2026, 11:23

लोणी काळभोर, ता. 29 : विद्यार्थी हा शाळेचा अविभाज्य घटक असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतूनच शाळेची आणि गावाची प्रगती साध्य होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिष्यवृत्ती, क्रीडा तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हवेली पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी दिली.

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके आणि श्लोक गणेश कुंजीर यांच्या वाढदिवसानिमित्त थेऊर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तारमळा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (ता. 29) उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सभापती काकडे बोलत होते. या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या उपसभापती विद्या गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य कावेरी कुंजीर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा काजल टेमगिरे, सदस्य रेश्मा पवार, राजश्री कुंजीर, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद माळी, राजेश केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कथालेखनात वीर भंडारी प्रथम; विश्वनाथ वाघमारेचे हस्ताक्षर स्पर्धेत यश
हवेली तालुकास्तरीय कथालेखन स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी वीर सुमित भंडारी याने प्रथम क्रमांक पटकावला, तर तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत विश्वनाथ नामदेव वाघमारे याने द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थ्यांचे सभापती युवराज काकडे यांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना विविध क्षेत्रांत प्रगतीची संधी मिळावी, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही गणेश नारायण कुंजीर मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील, असे गणेश कुंजीर यांनी सांगितले. या स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

दिवाळी साहित्य विक्रीतून व्यावहारिक ज्ञानाचे धडे

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने शाळेत दिवाळी साहित्य विक्रीची दुकाने उभारण्यात आली होती. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वस्तूंची विक्री, व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण यांची प्राथमिक माहिती मिळाली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका हिरेमठ, परदेशी, कुदळे, कुटे, सरोदे, सूर्यवंशी सर, निर्मला मॅडम आणि तारू काकू यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी विठ्ठल मोरे, सुखराज कुंजीर, मनसे नेते प्रशांत खांडे, सूरज सोनावणे, समर्थ बोडके, अमोल काकडे, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्रकला स्पर्धेतील वर्गनिहाय विजेते (पहिला, दुसरा तिसरा)

पहिली : स्वामिनी अजित बोडके, सार्थक दीपक थोरात, सारधा कुमारी

दुसरी : स्नेहल दत्तात्रय कांबळे, अकिश अंकुश राठोड, विश्वराज दत्ता शिंदे

तिसरी : राधा कुमारी, मार्तंड गणेश पोपळे, श्रुती बालाजी ढावारे

चौथी : स्वराली संतोष तुपसौंदर, श्रीराज राम शेंडगे, श्रीनिथी लखन शेंडगे

पाचवी : कुणाल बापू निकम, देवांश अजय कुंजीर, सई राहुल कुंजीर

सहावी : आदिराज नानासाहेब खेंडकर, शंभूराजे विकास कुंजीर, श्रीजित स्वप्नील भोसले

सातवी : श्रीगणेश प्रवीण व्यवहारे, अंशुमन रणजित शिंदे, गायत्री नामदेव वाघमारे

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तपासातील गंभीर त्रुटी भोवल्या! फुरसुंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Friday, 30 October 2026, 13:18

राजवडीत मातीचा ढिगारा कोसळला! २७ वर्षीय मजुराचा मृत्यू, एक जखमी; संरक्षण भिंतीच्या बांधकामावेळी दुर्घटना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घटनास्थळी भेट

Friday, 30 October 2026, 13:15

पुण्यात नवऱ्याला अन् त्याच्या मैत्रिणीला संपवण्यासाठी दिली १५ लाखांची सुपारी! पैशांसाठी हत्येचा कट, मागे डिटेक्टिव्ह लावले पण ऐनवेळी प्लॅन फसला अन् पत्नीचा भांडाफोड…

Friday, 30 October 2026, 12:31

पुण्यात दारूच्या नशेत धिंगाणा घालणं महिला पोलिसाला पडलं महागात! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तडकाफडकी निलंबन

Friday, 30 October 2026, 12:05

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची दुचाकीला भीषण धडक; ३० वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू!

Friday, 30 October 2026, 11:44

आंबळे येथे भीषण अपघात! कीर्तनावरून घरी परतणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर

Friday, 30 October 2026, 11:38
Next Post

सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण? भाव आणखी कमी होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp