Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंबळे येथे भीषण अपघात! कीर्तनावरून घरी परतणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर

योगेश मारणेby योगेश मारणे
Friday, 30 October 2026, 11:38

न्हावरे: आंबळे (ता.शिरूर) येथे कीर्तन ऐकून आनंदाने घरी परतणाऱ्या चौघांवर काळाने घाला घातला. न्हावरे-शिरूर रस्त्याने पायी जाणाऱ्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत दोन अल्पवयीन मुलांसह एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री उशिरा कीर्तन संपल्यानंतर केसरी हॉटेलसमोर हा काळजाचा थरकाप उडविणारा अपघात घडला. विशेष म्हणजे, चौघांना धडक दिल्यानंतर जखमींच्या मदतीला धावून जाण्याऐवजी संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या अमानुष प्रकारामुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून, एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय ६१), सोहम राजीव झेंडे (वय १३) आणि आरुषी दत्तात्रय झेंडे (वय ११, सर्व रा.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. तर ज्योती राजीव झेंडे (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतांचे नातेवाईक संतोष अनिल झेंडे (वय ३६, रा.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी या घटनेप्रकरणी न्हावरे पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे गावात सालाबाद प्रमाणे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त दररोज रात्री महाप्रसाद आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो, गुरुवारी (ता.२९) रात्री ज्योती झेंडे सासू कौशल्या झेंडे, मुलगा सोहम आणि शेजारी राहणारी व त्यांच्या चुलत जावेची मुलगी आरुषी हे चौघेही किर्तन ऐकण्यासाठी गावात गेले होते. कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा चौघेही न्हावरे-शिरूर रस्त्याच्या कडेने पायी आपल्या घराकडे निघाले होते.

दरम्यान, आंबळे गावाजवळ असलेल्या केसरी हॉटेलसमोर न्हावरे बाजूकडून शिरूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला पायी चाललेल्या चौघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चौघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात सोहम आणि आरुषी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. तर ज्योती आणि कौशल्या झेंडे यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून शिरूर येथे हलविण्यात आले. कौशल्या झेंडे यांना शिरूर येथील श्रीगणेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी कौशल्या झेंडे यांना मृत घोषित केले. तर ज्योती झेंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच आंबळे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतू, अपघात घडवून आणणाऱ्या वाहनचालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. एकाच कुटुंबातील सदस्यांसह दोन चिमुकल्यांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि वाहन चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले आणि शिरूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन, पुढील कारवाईच्या आणि अपघात घडवून आणणाऱ्या वाहनाचा व वाहनचालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार न्हावरे पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके पुढील तपास करीत आहेत.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात नवऱ्याला अन् त्याच्या मैत्रिणीला संपवण्यासाठी दिली १५ लाखांची सुपारी! पैशांसाठी हत्येचा कट, मागे डिटेक्टिव्ह लावले पण ऐनवेळी प्लॅन फसला अन् पत्नीचा भांडाफोड…

Friday, 30 October 2026, 12:31

पुण्यात दारूच्या नशेत धिंगाणा घालणं महिला पोलिसाला पडलं महागात! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तडकाफडकी निलंबन

Friday, 30 October 2026, 12:05

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची दुचाकीला भीषण धडक; ३० वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू!

Friday, 30 October 2026, 11:44

आंबळे येथे भीषण अपघात! कीर्तनावरून घरी परतणाऱ्या चौघांना अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर

Friday, 30 October 2026, 11:38

दौंड तालुक्यातील दापोडीत धार्मिक कार्यक्रमात नातेवाइकांमध्ये तुफान राडा! लोखंडी पळी अन् दगडाने हल्ला ; चार महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 30 October 2026, 11:18

पुण्यात सायबर चोरीचा पर्दाफाश! अकाउंटंटचा मोबाईल हॅक करून साहेबांच्या नावानं मेसेज पाठवत लावला १६ लाखांचा चुना

Friday, 30 October 2026, 11:14
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची दुचाकीला भीषण धडक; ३० वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp