हडपसर: हडपसरमधील भेकराईनगर परिसरात (Hadapsar News) मुल होत नसल्याच्या कारणावरून (Fursungi News) पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची (Daund News) धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा (Pune Crime) खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

प्रियांका आकाश दोडके (वय 27, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आकाश विष्णू दोडके (वय 35) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत प्रियांकाचा भाऊ सागर रामदास अडागळे (वय 35, रा. नानगाव, ता. दौंड) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि प्रियांका यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. आकाश हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याचे आई-वडील आणि भाऊ सिंहगड रस्ता परिसरात राहतात. विवाहानंतर प्रियांकाला मूल होत नसल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. गेल्या काही दिवसांपासून आकाश प्रियांकाच्या चारित्र्यावरही संशय घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या संशयातून आकाश प्रियांकाशी वाद घालत होता आणि तिला मारहाण करत होता. शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी रात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आकाशने प्रियांकाला मारहाण करून तिचा गळा आवळला. यात प्रियांका बेशुद्ध पडली. त्यानंतर आकाश थेट पोलीस चौकीत गेला आणि आपण पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रियांकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पत्नीचा खून केल्याप्रकरणी आकाश दोडके याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करत आहेत.







