पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (Hadapsar News) रामटेकडी बस थांब्यांवर बेकायदेशीरपणे (Pune News) जाहिरात फलक लावून विद्रुपीकरण करणाऱ्या दोन डेव्हलपर्सवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. PMPML प्रशासनाच्या आदेशानुसार हडपसर विभागात बेकायदेशीर बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असताना ही पाहणी करण्यात आली.

फिर्यादी त्यांच्या कर्तव्यावर असताना रामटेकडी बस स्टॉपवर (येताना आणि जाताना) तपासणी केली. त्यावेळी रामटेकडी जंक्शन येथील समोरासमोर असलेल्या दोन्ही बस थांब्यांवर ‘वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स, उरूळी कांचन’ आणि ‘साईसत्यम डेव्हलपर्स’ यांच्या गुंठेवारी प्लॉटिंगचे स्टीकर लावून अनधिकृत फ्लेक्स जाहिराती लावलेल्या आढळल्या. या जाहिराती विनापरवाना लावण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी या डेव्हलपर्सच्या मालकांची माहिती मिळवली आहे. वैभवलक्ष्मी डेव्हलपर्सचे मालक करण काकडे (रा. उरूळी कांचन) आणि साईसत्यम डेव्हलपर्सचे मालक रवी यादव (रा. मांदळवाडी पाबळ) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी विनापरवाना अवैध जाहिरात फलक लावून महाराष्ट्र विरूपण अधिनियम 1995 च्या कायद्याचा भंग केला आहे. तसेच, बस थांब्याचे विद्रुपीकरण केले आहे. या अनधिकृत फ्लेक्स जाहिराती दोन पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. PMPML च्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी या डेव्हलपर्सविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.







