Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यालगतच्या गावांमध्ये बांधकामाला हिरवा कंदील? PMRDAचे नवे नियम, जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 October 2026, 10:26

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच नगरपालिकांच्या हद्दीलगतच्या गावांमध्ये शेती विभागातील जमिनींच्या रहिवासी वापरासाठी बांधकाम परवानगी देण्याची कार्यपद्धती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) निश्चित केली आहे. प्रारूप स्ट्रक्चर प्लॅन प्रसिद्ध होईपर्यंत रद्द झालेल्या प्रारूप विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यांचाही बांधकाम परवानगीच्या प्रस्तावांमध्ये विचार केला जाणार आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीत विकास आराखडा (डीपी) तयार नसल्याने शहरालगतच्या गावांमधील बांधकाम परवानग्यांमध्ये अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने उपलब्ध तसेच प्रस्तावित रस्त्यांचे जाळे विचारात घेऊन विकास प्रस्तावांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

बांधकाम परवानगीच्या प्रस्तावांची छाननी करताना मंजूर प्रादेशिक योजनेतील रस्ते, रद्द झालेल्या प्रारूप विकास योजनेतील रस्ते, वर्गीकृत व नोंदणीकृत संमतीने प्रस्तावित रस्ते तसेच अन्य उपलब्ध रस्त्यांचा विचार करावा लागणार आहे. संबंधित जमिनीला आवश्यक रुंदीचा प्रत्यक्ष पोहोच रस्ता उपलब्ध असल्यासच प्रस्तावाच्या मंजुरीची पुढील कार्यवाही करता येणार आहे.

 

रस्त्यांच्या जाळ्याबाबत संदिग्धता किंवा विसंगती आढळल्यास संबंधित प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अभिप्रायासह सादर करावा. सक्षम स्तरावर निर्णय झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या परिपत्रकाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश विकास परवानगी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

परिघीय क्षेत्रालाही लागू : एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (UDCPR) महापालिका हद्दीपासून दोन किलोमीटर, नगर परिषद हद्दीपासून एक किलोमीटर आणि नगरपंचायत हद्दीपासून अर्धा किलोमीटरपर्यंतच्या परिघीय क्षेत्रात शेती विभागातील जमिनींचा रहिवासी वापर अनुज्ञेय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, विकास प्रस्तावांना परवानगी देताना उपलब्ध व प्रस्तावित रस्त्यांचे नियोजन विचारात घेणे बंधनकारक राहणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24
Next Post

पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच! भाजप-शिंदे गट आमनेसामने; जागा कोणाच्या खात्यात जाणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp