Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजमाता सईबाई स्मारकासाठी निधी मंजूर, तरी 2 वर्षांपासून काम संथ; नेमका अडथळा कुठे?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 October 2026, 10:18

विशाल शिंदे 

राजगड: राजगडाच्या पायथ्याशी पाल खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या राजमाता सईबाई स्मारकाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकस्थळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निधी मंजूर असताना आणि विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असताना प्रत्यक्ष कामाला वेग का मिळत नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

राजमाता सईबाई यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याबरोबरच या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक आणि पर्यटनाच्या दृष्टीने विविध विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र गेल्या काही काळापासून काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा

 

स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यासाठी राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे, राजगड पंचायत समितीचे उपसभापती संदीप खुटवड, पंचायत समिती सदस्य सीताताई खुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णा देशमाने यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते  विकास नलावडे, अंकुश गोविलकर, संतोष डांगे, लक्ष्मणराव खेडेकर, बाळासाहेब भरम, गणेश दारवटकर, तानाजी शिंदे, सुरेश शिंदे, अर्जुन भिलारे, भगवानराव बांदलआदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोकशी, शाखा अभियंता झेंडे आणि मोहिते यांच्याशीही स्मारकाच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली.

स्मारकाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींबाबत यावेळी माहिती घेण्यात आली. स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून जागेची मोजणी तसेच संबंधित विभागांकडील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

निधी असूनही काम संथ का?

सईबाई स्मारकासाठी शासनाच्या स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासनाच्या अधिकृत नोंदीनुसार पाल खुर्द येथील राजमाता सईबाई स्मृतीस्थळाच्या विकासासाठी सुधारित आराखड्याला ४६ कोटी ३३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. असे असताना प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती का मिळत नाही, हा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित होत आहे.

राजमाता सईबाई स्मृतीस्थळाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या परिसराच्या विकासामुळे इतिहासप्रेमी, पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी हे महत्त्वाचे ठिकाण म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. स्मारकाच्या विकास आराखड्यात पुरातत्त्वीय अवशेषांचे जतन आणि परिसराचा विकास करण्याचाही समावेश आहे. त्यामुळे आता पुन्हा पाहणी झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला किती गती मिळते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

निधीची तरतूद, विकास आराखडा, रस्त्याचा प्रश्न आणि मोजणी यांसारख्या बाबी पुढे गेल्या असतील तर उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने स्पष्ट कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली. स्मारकाचे काम लवकर पूर्ण झाले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

त्यामुळे आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन कामाला प्रत्यक्ष गती देणार का, काम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरविणार का आणि रखडलेल्या कामाबाबत संबंधित विभागांकडून ठोस कार्यवाही होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

 

“राजमाता सईबाई स्मारक हे आपल्या इतिहासाशी जोडलेले महत्त्वाचे स्मृतीस्थळ आहे. या स्मारकाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. निधी मंजूर आहे, आवश्यक प्रक्रिया पुढे गेली आहे, त्यामुळे आता कामाला कोणत्याही कारणाने विलंब होता कामा नये. संबंधित विभागांनी समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करावे. स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू.”

— किरण राऊत, अध्यक्ष, राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

“राजमाता सईबाई स्मारकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. निधी आणि विकासकामांची प्रक्रिया सुरू असताना प्रत्यक्ष कामाला गती मिळणे आवश्यक आहे. संबंधित विभागांनी उर्वरित अडचणी दूर करून काम वेळेत पूर्ण करावे. स्मारकाचे काम आता आणखी रखडू नये, ही आमची स्पष्ट मागणी आहे.”

— तानाजी मांगडे, जिल्हा परिषद सदस्य

मग प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती कधी?

स्मारकाच्या कामाला विलंबाची नेमकी कारणे कोणती, उर्वरित कामांसाठी किती कालावधी लागणार आणि प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार, याची माहिती आता स्थानिकांना अपेक्षित आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘पुणे बंद’च्या इशाऱ्याने प्रशासन अलर्ट! पहाटेच पोलिसांच्या पिंजरा गाड्या दाखल; अलका चौकात मोठी कारवाई होणार?

Wednesday, 7 October 2026, 12:00

चारचाकीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा; पत्नीला मारहाण; घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी धमकी; पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध तक्रार

Wednesday, 7 October 2026, 11:35

‘एटीएस अधिकारी’ असल्याचे भासवून 75 वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक; भामट्यांकडून 8 लाखांचा गंडा

Wednesday, 7 October 2026, 11:26

“मुली पळून जातात, पण…”; इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण..

Wednesday, 7 October 2026, 11:26

गोकुळच्या निवडणुकीत सत्तेचं लोणी कुणाच्या वाट्याला? नेत्यांची जागावाटपावरून रस्सीखेच

Wednesday, 7 October 2026, 11:17

पुण्यातून मुंबईला बोलावलं अन् खिडकीला बांधलं! तृतीयपंथीयावर मिरचीच्या धुरीचा छळ; पुढे जे घडलं ते….

Wednesday, 7 October 2026, 11:09
Next Post

जरांगेंची कोंडी वाढली!आंदोलनातील महिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; गंभीर आरोप करत गुन्ह्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp