Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पंढरपुरात FDA चा दणका! आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ३ हॉटेल्सवर कारवाई; परवाने निलंबित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 July 2026, 22:32

पंढरपूर : आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्नसुरक्षेबाबत विशेष मोहीम हाती घेतली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सोलापूर विभागाने शहरातील विविध हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन आढळल्याने तीन हॉटेल्सचे व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील एकूण २१७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण विक्रेते, खानावळी तसेच प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश होता. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे १७२ नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने शेगाव दुमाला येथील मंगलमूर्ती मिसळ व भेळ, हॉटेल स्वरा अँड चायनीज सेंटर आणि हॉटेल श्री विष्णू सहस्रनाम या तीन आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच त्यांच्या व्यवसाय परवान्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

वारीच्या काळात भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू नये, यासाठी प्रशासनाकडून अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, साठवणूक, वापरले जाणारे खाद्यतेल आणि इतर घटकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

 

याशिवाय, हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे, परिसर स्वच्छ ठेवावा आणि ग्राहकांसाठी मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६३५ वर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53

पुण्यात वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; 10 लाखांच्या 14 दुचाकी जप्त! पिंपरी-चिंचवडसह इतर जिल्ह्यांतील 12 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

Saturday, 12 September 2026, 11:49

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! तीन महिलांची सुटका, रिक्षाचालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 12 September 2026, 11:45

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12
Next Post

खोपोलीत थरार! दारूच्या नशेत किरकोळ वादातून कामगाराची लाकडी दांडक्याने ठेचून हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp