Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुधाच्या हव्यासापायी जीवाशी खेळ! FDA ची गोठ्यावर धाड, शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 July 2026, 22:37

पुणे : राज्यभरात सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न भेसळ आणि प्रतिबंधित औषधांच्या बेकायदेशीर वापराविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे, याच मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगर येथील एका गोठ्यावर छापा टाकून एफडीएच्या पथकाने धडक कारवाई केली. यावेळी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी म्हशींना बेकायदेशीरपणे टोचण्यात येणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शन्सचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन परिसरातील जसलोक हायस्कूलजवळ प्रकाश वाधवानी यांचा म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात प्रतिबंधित औषधांचा वापर होत असल्याची खात्रीशीर माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तेथे अचानक धाड टाकली. या कारवाईत जनावरांसाठी अत्यंत घातक असलेल्या ऑक्सिटोसिन या औषधाची तब्बल 612 इंजेक्शन्स आणि त्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ऑक्सिटोसिनचा वापर जनावरांसाठी कमालीचा वेदनादायी आणि क्रूर ठरतो. केवळ जनावरांनाच नाही, तर अशा प्रकारे काढलेले दूध पिणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाही यामुळे मोठा धोका निर्माण होतो. प्रामुख्याने लहान मुले आणि गर्भवती महिलांवर याचे अत्यंत विपरीत व गंभीर परिणाम होऊ शकतात. याच घातक परिणामांमुळे शासनाने या औषधाच्या विक्रीवर आणि वापरावर कायदेशीर बंदी घातली आहे.

 

याप्रकरणी जनावरांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि बेकायदेशीर औषधसाठा बाळगणाऱ्या संबंधित गोठा चालकाविरुद्ध अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे ठाणे जिल्हा आणि उल्हासनगर परिसरातील बेकायदेशीर दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुधाच्या हव्यासापायी जीवाशी खेळ! FDA ची गोठ्यावर धाड, शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

Saturday, 18 July 2026, 22:37

धंगेकर दाम्पत्य अडचणीत! पुण्यातील बिल्डरच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Saturday, 18 July 2026, 22:18

समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला; डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन, सोमवारी पुण्यात अंत्यसंस्कार

Saturday, 18 July 2026, 21:55

शिंदेंचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! 6 बंडखोर खासदार अधिकृतपणे गटात, ठाकरे गटाला धक्का

Saturday, 18 July 2026, 21:12

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासेसमध्ये CBI ची एंट्री; चौकशीने खळबळ

Saturday, 18 July 2026, 20:41

बहिणीने दागिने मागितले अन् उघड झाला लाखोंचा डाव! कपाटातून 1.32 लाखांचे सोनं गायब, कोरेगाव मूळमधील घटना

Saturday, 18 July 2026, 19:40
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.