Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे घरफोडी ; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास, घरात कोणी नसताना चोरीचा डाव यशस्वी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 21 June 2026, 16:47

उरुळी कांचन, (पुणे) : घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. शनिवारी (ता. 19) रात्री साडेबारा ते सव्वा एक वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) हद्दीतील गोळेवस्ती येथे ही घटना घडली.

याप्रकरणी शेतकरी मानसिंग संभाजी गोळे (वय -67, व्यवसाय- शेती, रा. गोळे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसिंग गोळे हे कुटुंबासहित गोळे वस्तीत एकत्र राहतात. त्यांचा मुलगा आशिष हा नोकरीनिमित्त मुंबईला राहत असल्याने मानसिंग गोळे हे बुधवारी (ता. 17) दुपारी 12 वाजता त्याला भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने फोन करून सांगितले कि, “तुमच्या घरातील एक बॅग आमच्या शेतात पडली आहे, तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून कुलूप-कोयंडा तुटलेला आहे, तसेच आतील सामान अस्ताव्यस्त पडले आहे.”

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजता मानसिंग गोळे घरी पोहोचले, तेव्हा मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला होता. घरात प्रवेश केला असता, चोरट्याने बेडरूममधील 3 कपाटे, किचन शेजारील खोलीतील 1 मोठे कपाट आणि देवघरातील 1 कपाट अशी एकूण 5 कपाटे उचकटून आतील सर्व सोने, नाणी आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे दिसून आले.

दरम्यान, गोळे यांनी आपल्या मोबाईलवरून घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता  चोरट्याने घरात घुसून ही घरफोडी केल्याचे समोर आले. या घटनेत दोन लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने असा तब्बल 3 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्या आधारे चोरट्याचा माग काढला जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऐजीनाथ शिंदे करीत आहेत.

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; भुगावमधील हॉटेल कर्मचाऱ्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 18:04

कर्कश किंकाळ्या, घरभर रक्ताचे डाग; शेजाऱ्यांनी पाहिलं तर 60 वर्षांचे 2 नराधम 15 वर्षीय चिमुरडी अन्

Sunday, 21 June 2026, 18:03

पहाटे पोहण्यासाठी उतरणे पडले महागात ; लोणी काळभोर येथील 28 वर्षीय तरुणाचा नीरा देवघर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू..

Sunday, 21 June 2026, 17:40

लोणी काळभोर येथील प्रताप ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गुरुदेव काळभोर तर राजमाता महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिता काळभोर..

Sunday, 21 June 2026, 17:31

हडपसरमध्ये रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; केवळ भाड्याच्या वादातून डोक्यात घातला दगड!

Sunday, 21 June 2026, 17:27

जमीन मिळणार फक्त 1 रुपयात; लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर सरकारने सुरु केली नवी योजना

Sunday, 21 June 2026, 17:02
Next Post

Pune-Daund DEMO Train : पुणे-दौंड 'डेमो'त भरदिवसा महिला प्रवाश्यांच्या समोरच रंगतोय जुगाराचा डाव; मद्यपींच्या उच्छादामुळे रेल्वे प्रशासन यंत्रणेचे तीन तेरा, नऊ बारा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.