Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंडमध्ये टेम्पो अडवून चालकासह चौघांवर हल्ला; गाई वाहतूक केल्याच्या संशयावरून मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 30 March 2026, 12:27

दौंड, ता. 30 : गाई वाहतूक करत (Daund News) असल्याच्या संशयावरून काही तरुणांनी टेम्पो अडवून चालकासह चार जणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दौंड शहरातील भाजीमंडई परिसरात 27 मार्चला घडली. या हल्ल्यात चालकाचा हात फ्रॅक्चर झाला असून आरोपींविरुद्ध जबरी मारहाण, लूट व धमकी यांसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे दौंड परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे

याप्रकरणी टेम्पो चालक शाहरुख नूर शेख (वय 30, रा. लोहीया नगर, स्वारगेट, पुणे) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुद्राक्ष लवटे, सुरेश पालवे (दोघे रा. गोपाळवाडी), सोनू थोरात (रा. गांधी चौक), संकेत दळवी (रा. मोरेवस्ती, लिंगाळी) व एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 119(1), 189(2), 189(4), 191(2), 191(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख शेख हे टेम्पो चालक असून 27 मार्च रोजी दुपारी त्यांना टेम्पो मालकाचा फोन आला होता. भरतगाव (ता. दौंड) येथून जर्सी गाई चापडगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे नेण्याचे भाडे मिळाल्याने त्यांनी एमएच-12 केपी-5199 क्रमांकाचा टेम्पो घेऊन प्रवास सुरू केला. गाई खरेदीदार मंगेश सोनवणे व त्यांचे मित्र प्रतीक नागटिळक यांना सोबत घेऊन त्यांनी भरतगाव येथून नऊ जर्सी गाई टेम्पोमध्ये भरल्या व दौंड मार्गे चापडगावकडे निघाले.

 

रात्री सुमारे 11 वाजता दौंड शहरात आल्यानंतर त्यांचा रस्ता चुकला आणि टेम्पो भाजीमंडई परिसरात गेला. तेथे काही जणांनी टेम्पो थांबवून चौकशी सुरू केली. टेम्पोमध्ये गाई असल्याचे समजताच, संशयितांनी चालक व सोबत असलेल्या तिघांवर शिवीगाळ करत “गाई कत्तलीसाठी नेत आहात” असा आरोप केला. त्यानंतर एका आरोपीने शाहरुख शेख यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या मारहाणीत शेख यांच्यासह मंगेश सोनवणे, प्रतीक नागटिळक आणि टेम्पो मालक रेहान शेख यांनाही दुखापत झाली. मारहाणीदरम्यान एका आरोपीने शाहरुख शेख यांच्या हातातील पांढऱ्या धातूची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली तसेच त्यांच्या शर्टच्या खिशातील 1 हजार 300 रुपयेही हिसकावून घेतले आहेत. आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जखमींनी दौंड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. शाहरुख शेख व रेहान शेख यांना अधिक मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या एक्स-रे तपासणीत शाहरुख शेख यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले.

या प्रकरणात पोलिसांनी सामूहिक मारहाण, जबरी चोरी, धमकी व कायद्याला हात घालणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गजानन शिंदे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्व हादरले; इंडस्ट्रीतील छळाला कंटाळून संपवले आयुष्य? मावशीने सांगितलं कारण

Tuesday, 16 June 2026, 13:40

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23
Next Post

दौंडमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांची चोरी; पोलिस हवालदाराच्या घरावर चोरट्याचा डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.