अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना शिक्रापूर हद्दीतील चाकण चौकाजवळ तळेगाव रोडवर घडली आहे.

याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट आणि स्टंपने मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील चाकण चौकाजवळ तळेगाव रोडवर क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला .
या वादातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी हाताने लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी क्रिकेट बॅट आणि स्टंपने मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या घटनेत काही जणांना दुखापत झाल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी मकसुद जाफरअली खान वय २६, हमीद रियाज खान वय २५, सलामत जाफरअली खान वय २८, बिलाल बरकतअली खान वय २२ आणि जावेद मुस्ताक शहा वय २२, सर्व रा. महाबळेश्वर नगर, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, यांना तपासकामी अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमनान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार अमोल दांडगे, बापू हाडगळे, शिवाजी चितारे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके, विकास बांगर, मच्छिंद्र निचीत आणि संतोष बाबर यांच्या पथकाने सहभाग घेत हे कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.







