Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चष्म्यात लपवला कॅमेरा अन् टॉयलेटमध्ये जाऊन पाहिली उत्तरं! पुणे महापालिका भरतीतील ‘हायटेक कॉपी’चा भंडाफोड

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 29 August 2026, 8:45

पुणे: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पाय कॅमेरा बसवलेल्या चष्म्याचा वापर करून परीक्षेतील प्रश्न बाहेर पाठविल्याचा आरोप तीन उमेदवारांवर आहे. या प्रकरणी संबंधित तीन उमेदवारांसह परीक्षा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासन आणि IBPS संस्थेने सुमारे दीड महिना केलेल्या तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपासानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगरमधील आयकॉन डिजिटल झोन चिखलठाणा परीक्षा केंद्रावर हा गैरप्रकार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या परीक्षेला बसलेल्या एकूण 20,735 उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगशीटची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तीन उमेदवारांच्या उत्तर देण्याच्या पद्धतीत मोठी विसंगती आढळली. परीक्षेच्या सुरुवातीच्या 30 मिनिटांत त्यांनी फक्त प्रश्न वाचले. त्यानंतर तिघेही स्वच्छतागृहात गेले. तेथून परतल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत त्यांनी तब्बल 100 प्रश्न सोडवले. यातील 90 हून अधिक प्रश्नांची उत्तरे अचूक असल्याचे तपासात दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल लॉगचे विश्लेषण केल्यानंतर उमेदवारांनी चष्म्यात लपवलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संगणकावरील प्रश्न बाहेर पाठवल्याचा संशय बळावला. त्यानंतर स्वच्छतागृहात मिळालेल्या मदतीच्या आधारे उत्तरे शोधून ती परीक्षेत भरल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे आणि विष्णूकांत वाघमारे या तीन उमेदवारांसह योगेश राठोड आणि विकास गायकवाड या दोन परीक्षा केंद्र कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी हा पेपरफुटीचा प्रकार नसून हायटेक कॉपीचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, भरतीतील गैरप्रकाराशी संबंधित जागा वगळून उर्वरित 146 पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट! निवडणुकीत ‘बोगस मतदान’ झाल्याचा गंभीर आरोप..

Thursday, 29 October 2026, 14:34

पुण्यात चोरट्यांची भन्नाट शक्कल! फोनऐवजी वॉकी-टॉकीचा वापर, पण एका कारने सगळं भिंग फोडलं…

Thursday, 29 October 2026, 14:00

वाघोलीतील लाइफलाईन हॉस्पिटल जवळ दोघांना 5 ते 7 जणांची मारहाण

Thursday, 29 October 2026, 13:38

शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली!PM किसानचा 24 वा हप्ता उद्या येणार? खात्यात पैसे जमा होणार की नाही, एका क्लिकवर तपासा!

Thursday, 29 October 2026, 13:17

मोठी बातमी!सरकारने आणखी एक योजना गुंडाळली ; कोणाला फटका, नेमकं कारण काय?

Thursday, 29 October 2026, 12:55

पाण्यासाठी एल्गार! उंडवडी सुप्यात बेमुदत उपोषण सुरू; शेतकऱ्यांच्या 6 प्रमुख मागण्या

Thursday, 29 October 2026, 12:45
Next Post

5 तरुणींना घरात डांबून ठेवलं अन् केली जबर मारहाण; घटनेने परिसरात खळबळ; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp