दौंड: दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Patas Sugar Factory) कारभाराची चौकशी करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक (MLA Rahul Kul) साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 83 (1) अन्वये ही चौकशी (Ramesh Thorat) लावण्यात आली आहे. (Daund News)

या कारखान्याचे अध्यक्ष भाजपचे आमदार राहुल कुल असून, माजी आमदार रमेश थोरात तसेच काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली आहे. संबंधित प्रकरण सहकार मंत्र्यांकडे दाखल होते. त्यानंतर कायद्यातील तरतुदींची पूर्तता तपासण्यासाठी हे प्रकरण फेरनिर्णयार्थ साखर सहसंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. उभय पक्षांची संयुक्त सुनावणी झाल्यानंतर चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले.
कारखान्याच्या कारभारातील एकूण 13 विविध मुद्द्यांवर सखोल चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक (वर्ग 1) साखर द्वारकानाथ पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने, जिल्ह्यातील भाजपच्या एकमेव आमदाराला राजकीय दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र अधिकृतरीत्या ही कारवाई तक्रारींच्या आधारे आणि कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या चौकशीच्या निष्कर्षानंतरच पुढील कारवाईबाबत स्पष्टता येणार असून, जिल्ह्यातील सहकार राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






