बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati News) आणि फुरसुंगी या दोन नगर परिषदांसाठी (Baramati Election) आज शनिवारी मतदान होत आहे. राज्यातील (Baramati Nagarparishad Nivadnuk) सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार होते. मात्र काही प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका दाखल झाल्याने काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेचा समावेश होता. आज या दोन्ही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच बारामतीत एक धक्कादायक आणि अघोरी प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

नारळ, लिंबू आणि भात ठेवून उतारा
बारामती शहरातील आमराई परिसरात प्रभाग 14 मधील एका मतदान केंद्राजवळ हा प्रकार उघडकीस आला. एका उमेदवाराच्या बूथपासून काही अंतरावर नारळ, लिंबू आणि भात ठेवून उतारा टाकण्यात आल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हा उतारा थेट उमेदवाराच्या मतपत्रिकेच्या आवाहन पत्रिकेवर टाकण्यात आला होता. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मतदारांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. (Breaking News)
मतदानासाठी ‘करणी’चा आधार?
आमराई परिसरातील प्रभाग 14 मध्ये यंदा चुरशीची आणि लक्षवेधी लढत होत आहे. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अघोरी विद्येचा प्रयोग करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार समोर येताच अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून समाज अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला असल्याचे पुन्हा एकदा दिसून आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून संबंधित ठिकाणाहून उतारा हटवण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेतही आज शांततेत मतदान सुरू आहे. दोन्ही नगर परिषदांतील मतदानाचा निकाल मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असून राजकीय पक्षांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.







