उरुळी कांचन, (पुणे) : मानव अधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हानिरीक्षकपदी उरुळी कांचन येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अभिषेक धनंजय कांचन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपसचिवपदी अखिल राजेंद्र जाधव, हवेली तालुका उपाध्यक्षपदी संदीप लक्ष्मण मेमाणे तर सचिवपदी सागर माणिक कांचन यांची निवड करण्यात आली आहे.

मानव अधिकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान दाटिया, प्रदेश जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्याचे सचिव शरद पोपट म्हस्के यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

अभिषेक कांचन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व केलेल्या कामाची पाहणी करून मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या कमिटीने अभिषेक कांचन व यांची उपाध्यक्षपदावरून निरीक्षक पदावर नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे विविध क्षेत्रांतून कांचन यांचे अभिनंदन होत आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय मानव अधिकार आयोग ही 28 सप्टेंबर 1993 च्या मानव अधिकार संरक्षण अध्यादेशानुसार 12 ऑक्टोबर 1993 रोजी स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक संस्था आहे. त्याला मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 द्वारे वैधानिक आधार दिला गेला. हे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जबाबदार आहे. व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित अधिकार आहेत. जे राज्यघटनेद्वारे हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये मूर्त स्वरूप असलेले आणि भारतातील न्यायालयांद्वारे लागू करण्यायोग्य आहे.
या निवडीनंतर बोलताना अभिषेक कांचन म्हणाले, “पद हे केवळ सन्मानासाठी नसून जबाबदारीसाठी आहे. माझ्या कार्याची दखल घेऊन समितीने माझ्यावर जिल्हास्तरीय जबाबदारी सोपविली आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत नागरिकांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे आणि निडरपणे काम करत राहणार आहे.







