Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खंडणी मागितल्या प्रकरणी निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष; तक्रारदाराने घेतली माघार

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 29 September 2026, 14:10

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याला खंडणीच्या एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या आरोपाशी संबंधित या प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.

हे प्रकरण 2020 मधील आहे. त्यावेळी निलेश घायवळ कारागृहात होता. संतोष धुमाळ याच्यावर तक्रारदाराकडून त्याच्या भावाच्या रॅलीसाठी जीप देण्याच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेने केला होता.

मात्र, न्यायालयीन सुनावणीदरम्यान तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या सुरुवातीच्या तक्रारीतील आरोपांपासून माघार घेतली. पोलिसांच्या दबावामुळे तक्रार दाखल केल्याचा दावा त्याने न्यायालयात केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवलेल्या जबाबातही त्याने संबंधित घटना घडली नसल्याचे सांगितले.

या प्रकरणातील अन्य साक्षीदार आणि पंच साक्षीदारांनीही सरकारी पक्षाच्या आरोपांना दुजोरा दिला नाही. त्यामुळे खंडणीचा आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट झाले आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

दरम्यान, निलेश घायवळचे नाव पुण्यातील विविध गुन्ह्यांच्या तपासात यापूर्वीही समोर आले आहे. कोथरुडमधील गोळीबाराच्या एका प्रकरणानंतर त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी 2021 मध्ये एका दरोड्याच्या प्रकरणात घायवळला अटक करण्यात आली होती. 2022 मध्ये त्याला जामीन मिळाला. त्यावेळी पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याने पासपोर्ट जमा केला नसल्याचा आरोप आहे.

नंतर त्याने आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून पासपोर्टसाठी अर्ज केल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो युरोपमध्ये गेल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली होती. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

Wednesday, 30 September 2026, 16:32

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

Wednesday, 30 September 2026, 16:29

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

Wednesday, 30 September 2026, 16:12

जरांगेंचा मोठा यू-टर्न! 2 कोटींची’ डिफेंडर ‘केली परत; ‘या’ कारणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Wednesday, 30 September 2026, 15:42

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वीज अपघातात जनावर दगावल्यास मिळणार ५० हजार रुपये भरपाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wednesday, 30 September 2026, 15:35

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11
Next Post

आधी शिक्षकाने दोन लेकरांसह आयुष्य संपवलं ,आता मानसिक धक्यातून पत्नीचाही अंत; एकाच कुटुंबातील चौघांचा धक्कादायक मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp