Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी शिक्षकाने दोन लेकरांसह आयुष्य संपवलं ,आता मानसिक धक्यातून पत्नीचाही अंत; एकाच कुटुंबातील चौघांचा धक्कादायक मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 September 2026, 14:23

नांदेड : जिल्ह्यातील एका दुर्दैवी घटनेत अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण मोरे कुटुंब संपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पती, दोन मुले आणि आता पत्नीचाही मृत्यू झाल्याने या सुखी परिवाराचा अंत झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी, हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले 42 वर्षीय शिक्षक सुनील मोरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. व्हॉट्सॲपवर आत्महत्येचा संदेश ठेवून त्यांनी रात्रीच्या वेळी झोपेत असलेल्या 14 वर्षांची मुलगी सारा आणि 10 वर्षांचा मुलगा सुमेध यांची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर 17 जुलै रोजी त्यांनी आपली भरधाव कार पुणेगाव येथील पुलावरून 50 फूट खोल गोदावरी नदीच्या पात्रात फेकून आयुष्य संपवले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण मुलांसह हे पाऊल उचलत असल्याचे मोरे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये स्पष्ट केले होते. यामध्ये गट शिक्षण अधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला होता.

पती आणि दोन्ही मुलांच्या अचानक निघून जाण्यामुळे सुनील मोरे यांच्या पत्नी शिक्षिका धम्मशीला मोरे या अत्यंत भीषण मानसिक तणावाखाली होत्या. त्या गेल्या तीन महिन्यांपासून सतत दुःखात होत्या आणि घराबाहेर पडणेही त्यांनी बंद केले होते. याआधीही त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता.

 

दोन दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल रात्री त्यांचीही प्राणज्योत मालवली. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील चारही जणांचा अडीच ते तीन महिन्यांच्या अंतराने दुर्दैवी अंत झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25

आधी शिक्षकाने दोन लेकरांसह आयुष्य संपवलं ,आता मानसिक धक्यातून पत्नीचाही अंत; एकाच कुटुंबातील चौघांचा धक्कादायक मृत्यू

Tuesday, 29 September 2026, 14:23
Next Post

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp