इंदापुर : 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिगवण (ता.इंदापूर) परिसरात शुक्रवारी (दि.06) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भिगवन पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

समीर शेख (रा.कोठारी हाँस्पीटल शेजारी भिगवण,ता. इंदापुर,जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीची आई फातिमा (नाव बदलेले आहे) रा.मुळ गाव.भिगवण स्टेशन, ता. इंदापुर, जि, पुणे, सध्या रा. मोरे हाँस्पीटल शर्मा पेट्रोलपंपाचे पाठीमागे भिगवण ता. इंदापुर,जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करणारी महिला 40 वर्षीय असून भिगवण परिसरात राहत आहे. महिला मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घराजवळून त्यांच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने कशाचे तरी आमिष दाखवुन आपल्या सोबत पळवून नेले. अशी तक्रार मुलीच्या आईने भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार समीर शेख याच्याविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 159/25 कलम 137 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वारगड हे करीत आहे.







