Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप्पाच्या विसर्जनात लुटीचा मोठा डाव! सुऱ्या, कटर अन् मिरचीपूड घेऊन 11 जण नदीपात्रात दबा धरून बसले अन् पुढे पोलिसांनी

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 27 September 2026, 12:15

पुणे: गणेश विसर्जनासाठी शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली असताना, गर्दीचा फायदा घेऊन चोरी आणि दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई करत 11 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 63 महागडे मोबाईल फोन, एक चारचाकी आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 30 लाख 57 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

अब्दुल कादिर नूर महंमद (28), अब्दुल मालिक अब्दुल खालीक (22), झीआउर रहमान अताउर रहमान शौकत हुसेन (26), महंमद असवद महंमद अजमल (31), फैसल अजीज खान (24), हुजेफा अंजुम महंमद साजिद अन्सारी (30), जुबेर अहमद मुख्तार अहमद (35), अझर अहमद अल्लाफ अहमद मोमीन (30), नावेद अख्तार शफीक अहमद अन्सारी (33), अतहर अहमद एजाज अहमद (23) आणि अतुल मारोती इंगळे (24) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना मुठा नदीपात्रात काही जण शस्त्रांसह एकत्र जमले होते. गर्दीचा फायदा घेत दरोडा टाकण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अमर काळगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने नदीपात्रात धाव घेत कारवाई केली.

पोलिसांनी संशयितांना घेरून ताब्यात घेतल्यानंतर त्यांची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे धारदार सुऱ्या, कटर, दोरी आणि मिरचीपूड आढळून आली. गर्दीत नागरिकांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्याकडील वस्तू लुटण्याची तयारी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

 

तपासात या आरोपींकडे विविध नामांकित कंपन्यांचे 63 महागडे स्मार्टफोन आणि एक चारचाकी वाहनही सापडले. हे मोबाईल यापूर्वी गर्दीतून चोरले असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी 10 जण मालेगाव, नाशिक येथील असून एक आरोपी वाशीम जिल्ह्यातील गिरोली येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.  या टोळीने विसर्जनाच्या गर्दीत आणखी किती नागरिकांना लक्ष्य केले आहे, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30

‘लाडक्या बहिणीं’ची एसटी सवलत धोक्यात! NCMC कार्ड नसल्यास 1 ऑक्टोबरपासून मिळणार नाही सवलत

Monday, 28 September 2026, 14:06

दुष्काळाची झळ आता शेअर बाजारालाही? महाराष्ट्रातील परिस्थितीने वाढवली चिंता

Monday, 28 September 2026, 13:55

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32
Next Post

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’! मेसची दरवाढ अखेर रद्द; अनेकांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp