Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

30 वर्षीय तरुणी, गळा चिरलेला मृतदेह; मोशीतील घटनेने खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 13 October 2026, 10:20

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात एका 30 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंत्रा मोमेंट हाउसिंग कॉम्प्लेक्समधील कमर्शियल ऑफिस परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मृत महिलेचे नाव प्रियंका आकाश कांबळे (वय 30) असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा आढळल्या. गळा चिरून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा प्रकार कोणी आणि कोणत्या कारणातून केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री सुमारे 2 वाजता मोशीतील मंत्रा मोमेंट हाउसिंग कॉम्प्लेक्समधील कमर्शियल ऑफिसच्या शॉप क्रमांक 7 जवळ एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाची मदत घेण्यात आली. त्यानंतर मृतदेह प्रियंका कांबळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे मोशी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, घटनेमागे कोणाचा हात आहे आणि आरोपीचा शोध कसा लागणार, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येण्याची अपेक्षा आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“बरं नाहीये, तुला दवाखान्यात घेऊन जातो…” म्हणत क्लिनिकमध्ये नेलं अन् नंतर आळीपाळीने तोडले 19 वर्षीय तरुणीच्या शरीराचे लचके

Tuesday, 13 October 2026, 11:16

अवघ्या 10 मिनिटांत होत्याचं नव्हतं! 3 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचं 10 लाखांचं नुकसान; आलेगाव पागात नेमकं काय घडलं?

Tuesday, 13 October 2026, 10:34

पुणे बाजार समितीच्या चौकशीचे पणनमंत्र्यांचे आदेश! माजी सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर यांचे आरोप; सभापती प्रकाश जगताप यांनी फेटाळले आरोप

Tuesday, 13 October 2026, 10:26

30 वर्षीय तरुणी, गळा चिरलेला मृतदेह; मोशीतील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:20

मध्यस्थी करायला गेला अन् मृत्यूने गाठलं! तिघांनी घेरलं, फरफटत नेलं, सपासप वार केले; पुण्यातील घटनेने खळबळ

Tuesday, 13 October 2026, 10:05

गोलेगावच्या सुपुत्राला राष्ट्रपती पदक; डीवायएसपी अनिल कटके यांचा विशेष सन्मान

Tuesday, 13 October 2026, 9:43
Next Post

पुणे बाजार समितीच्या चौकशीचे पणनमंत्र्यांचे आदेश! माजी सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर यांचे आरोप; सभापती प्रकाश जगताप यांनी फेटाळले आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp