प्रतिनिधी,अमित मुंडीक
Pune Crime: पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादीला जबरदस्ती गाडीत बसवून धमकावणाऱ्या आणि त्याच्यावर दोन पिस्तुले लावून जीव घेण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर प्रमुख आरोपी श्वेतांग भास्कर निकाळजे (वय 37) याच्याकडून दोन अग्नीशस्त्रे आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा- Pune News: अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत येरवडा पोलिसांचे यश; छापेमारीत 20 लाखांचा गुटखा केला जप्त
घटना 8 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.45 वाजता घडली. फिर्यादी शिवा धनराज मुत्याळ (वय 31) हे आपल्या घराच्या पार्किंगमध्ये असताना आरोपी श्वेतांग निकाळजे यांनी ‘लग्न करू नये’ आणि ‘एअरटेल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावेत’ या हेतूने त्यांना जबरदस्तीने चारचाकीत बसवले. त्यानंतर भोर रोडवर नेऊन दोन्ही पिस्तुले डोक्यावर लावून “तुला कोणत्या पिस्टलने गोळी घालू?” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
आरोपीच्या साथीदारांनीही कोयत्याने हल्ला करण्याची धमकी दिली होती. फिर्यादी त्यांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर आरोपींनी त्याच्या मित्रांनाही शिवाजीनगर येथे नेऊन मारहाण केली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 507/2025 भारतीय न्याय संहिता कलम 140(2), 127(2), 351(3), 352, 3(5), भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
तपासादरम्यान पोलीस अंमलदारांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी श्वेतांग निकाळजे आणि त्याचा साथीदार ओम गायकवाड (वय 26) यांना 20 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत चौकशीदरम्यान आरोपी श्वेतांग निकाळजे याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तुले आणि गाडी पोलिसांनी जप्त केली.
ही कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, मा. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, मा. मिलिंद मोहिते, पोलीस उपआयुक्त, आणि मा. राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, PSI निलेश मोकाशी, तसेच पथकातील अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी सहभाग घेतला.







