Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: आंतरजिल्हा घरफोडी टोळी जेरबंद;  8 लाख 50 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 5 November 2025, 22:08
Pune Crime: Pune Rural Police's major action: Inter-district burglary gang arrested; Property worth Rs 8 lakh 50 thousand seized

Pune Prime News

अमित मुंडीक

 

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (Pune Crime) आणि आळेफाटा पोलीस स्टेशनच्या (Pune News) संयुक्त कारवाईत घरफोडी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच गुन्हे उघडकीस आणून सुमारे 8 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोहन भिकाजी भोसले (वय 20) आणि किशोर हापूस भोसले (वय 20, दोघे रा. कासाटी, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं. 277/2025 अन्वये विक्रम महादू डेरे यांच्या घरफोडी प्रकरणात तपास सुरू असताना आरोपींचा मागोवा पोलिसांनी घेतला. फिर्यादी काही दिवस बाहेरगावी गेल्याने आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची फिर्याद होती.

सणासुदीच्या काळात जुन्नर व खेड उपविभागात वाढलेल्या घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित यूनिकॉर्न मोटारसायकलचा शोध घेण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना आळेफाटा परिसरातून अटक केली. सखोल चौकशीत आरोपींनी आळेफाटा, नारायणगाव आणि मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच घरफोडी गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.

आरोपींकडून 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 180 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, रोख रक्कम आणि यूनिकॉर्न मोटारसायकल – एकूण किंमत अंदाजे 8,50,000 रुपये असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल (पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील (जुन्नर विभाग) व अमोल मांडवे (खेड विभाग) यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अविनाश शिळीमकर, आळेफाटा पो.नि. विश्वास जाधव, मंचर पो.नि. श्रीकांत कंकाळ, नारायणगाव पो.ठा.चे सपोनि. प्रविण सांगे, तसेच महोदय शेलार, अमित सिदपाटील, विक्रम तापकीर, दिपक साबळे, हेमंत विरोळे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, सतिश टाव्हरे, अमित म्हाळुंजे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, नवीन आरगडे, गणेश जगताप, ओंकार खुणे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

Tuesday, 31 March 2026, 22:59

अहिल्यानगर हादरलं! पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ; साठवण तलावात तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, शोधकार्य सुरू

Tuesday, 31 March 2026, 22:14

शेताला पाणी देण्यावरून बाप-लेकात वाद! मुलाने शिव्या दिल्या म्हणून जन्मदात्याने पोटच्या लेकाला झोपेतच संपवलं…

Tuesday, 31 March 2026, 21:45
Next Post
Pune Crime: 3 village pistols seized near Narayangaon ST stand; 3 suspects arrested in joint operation by Pune Rural Police

Pune Crime: नारायणगाव एस.टी. स्टँडजवळ 3 गावठी पिस्तुले जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3 संशयित अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.