Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; तीन सराईत चोरटे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीसांची संयुक्त कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 5 November 2025, 22:46
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Photo-Social Media

अक्षय टेमगिरे

 

शिक्रापूर: दि. 5 नोव्हेंबर पुणे–अहिल्यानगर महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असुन स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत या टोळीतील तीन आरोपींना अटक करत तब्बल सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 7.5 तोळे सोन्याचे दागिने, दोन कोयते आणि मोटारसायकल असा एकूण 5 लाख 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आकाश पांडुरंग शिंदे (वय 30), महेश मानाजी शिंदे (वय 31), राहूल रामदास पवार (वय 30) तिघे (रा. वेळद, ता. नगर, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत.

दि. 4 जून 2025 रोजी पहाटेच्या सुमारास कोंढापुरी ता. शिरूर येथील सुरज पेट्रोल पंपाजवळ निसान टेरेनो कार क्र. MH 01 BU 0366 या कार मध्ये झोपलेल्या सोपान राधाकिसन आंधळे रा. शेवगाव, जि. अहिल्यानगर व त्यांच्या कुटुंबावर तीन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती. चोरट्यांनी फिर्यादीकडून 500 रुपये व पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठन असा एकूण 90 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.

या घटनेनंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्ह्यांचा तपास सुरू करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 125 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून संशयितांचा मागोवा घेतला. पोलिसांनी शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर जि. पुणे व सुपा जि. अहिल्यानगर पोलीस ठाण्यांतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले, ज्यामध्ये कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी, दरोडा व मालमत्ता चोरीचे गुन्हे आहेत.

या सर्व आरोपींचा गुन्हेगारी इतिहास असून आरोपी आकाश शिंदे याच्यावर 8 गुन्हे, महेश शिंदे याच्यावर 6 गुन्हे तर राहुल पवार याच्यावर 2 गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी रिमांड देण्यात आले आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पो.स्टे.चे पो.नि. दिपरतन गायकवाड, शिरूरचे पो.नि. संदेश केंजळे, रांजणगावचे पो.नि. महादेव वाघमोडे, तसेच पो.सई महेश डोंगरे, विजय मस्कर, पो.अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, संजू जाधव, सागर धुमाळ, जयराज देवकर, अमोल नलगे, अमोल दांडगे, रोहीत पारखे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची जबरी चोरी विरोधात प्रभावी कारवाई या कारवाईमुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावरील चोऱ्यांच्या मालिकेला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37

भोंदू ऋषिकेश वैद्यचं कोठडीतही “भक्ती”चं नाटक! पूजेच्या साहित्यासाठी न्यायालयात धाव; पण पोलिसांनी अन् कोर्टाने दाखवला इंगा

Tuesday, 31 March 2026, 22:59

अहिल्यानगर हादरलं! पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ; साठवण तलावात तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू, शोधकार्य सुरू

Tuesday, 31 March 2026, 22:14
Next Post
Pune Crime: Pistol purchased from Sangvi for 'target killing' but police vigilance foiled the plot; 8 people in police custody

Pune Crime: 'टारगेट किलिंग'साठी सांगवीतून खरेदी केलं पिस्तूल पण पोलिसांच्या सतर्कतेने डाव उधळला; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.