Pune Crime: पुणे: पुणे (Pune) शहरातील वारजे परिसरात एका चोरट्याने शकल्ल लढवून दिवसाढवळा चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर रस्त्यावर एकच बोंबाबोम झाली. विशेष म्हणजे, तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितांना पोलीस ठाण्यात सात तास बसवून ठेवण्यात आले दरम्यान त्यात गुन्हा दाखल न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश अण्णासाहेब पोळ (वय 35, रा. ओंकार कॉलनी, वारजे माळवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 11.15 वाजता ते, त्यांची पत्नी आणि मुलगी दुचाकीवरून कर्वेनगर पुलाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने आलेल्या एका तरुणाच्या दुचाकीचे हँडल त्यांच्या गाडीला धडकले. त्यामुळे तूला अक्कल आहे का असा प्रश्न विचारताच, तरुण संपातला. तो गाडीवरून खाली उरतला, त्याने पोळ यांची गाडी ढकलली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही खाली पडले. भररस्त्यात त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपी तरूणाने पीडिताचा गळा आवळला आणि दरम्यान त्यांच्या गळात असलेली 9 लाख रुपयांची सोन्याची चैन तुटली आणि आरोपीने बड्या शिताफीने ती चैन काढून घेतली. सोन्याची चैन चोरी झाल्याचे लक्ष्यात येताच, पीडितांनी तात्काळ वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोळ दाम्पत्याला दुपारी दुपारी 1 ते रात्री सांयकाळी 8 पर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले आणि शेवटी कोणताही गुन्हा नोंदवता त्यांना परत पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे वारजे परिसरात मोठी चर्चा रंगली असून पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.







