Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांचे अंडरग्राउंड मेट्रो प्रवासाचे स्वप्न भंगणार? पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; ‘या’ मार्गिकेला स्पष्ट नकार!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 November 2026, 22:12

पुणे : पुण्यातील कोंढवा-येवलेवाडी-उंड्री या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेसाठी भूमिगत (अंडरग्राउंड) पर्याय स्वीकारण्यास पुणे महापालिकेने नकार दिला आहे. भूमिगत मेट्रोसाठी उन्नत मार्गिकेच्या तुलनेत जवळपास तिप्पट खर्च येणार असल्याने आर्थिक बोजा टाळण्यासाठी पालिकेने उन्नत मेट्रोचाच पर्याय पुढे केला आहे.

या मार्गिकेसाठी संबंधित परिसरातील रस्त्यांची अपुरी रुंदी हा मोठा अडथळा ठरत आहे. रस्ते रुंद झाल्यास उन्नत मेट्रो शक्य होईल; अन्यथा भूमिगत मार्गाचा विचार करावा लागेल, असे महामेट्रोने स्पष्ट केले होते. त्यावर तोडगा म्हणून मंजूर विकास आराखड्यानुसार (डीपी) रस्ते रुंदीकरण करून उन्नत मेट्रोसाठी जागा उपलब्ध करून देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.

जिल्हा न्यायालय ते कोंढवा-येवलेवाडी-उंड्री ही प्रस्तावित मार्गिका उन्नतच असावी आणि तिचा समावेश सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) करावा, अशी विनंती करणारे पत्र महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी २० नोव्हेंबर रोजी महामेट्रोला पाठवले आहे.

महामेट्रोने मार्च ते जुलै २०२६ दरम्यान पत्रव्यवहार करून तसेच २७ मे रोजी संयुक्त पाहणी करून डीपी रस्त्यांच्या रुंदीकरणाची मागणी केली होती. तसेच १० सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रात प्रकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो, असे नमूद केले होते. ऑक्टोबर २०२७ पर्यंत रस्ते रुंदीकरण पूर्ण होईल का, अशी विचारणाही करण्यात आली होती.

महापालिकेने रस्ते रुंदीकरणाचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्ष भूसंपादन, जागा ताब्यात घेणे आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान असणार आहे.

“महापालिकेने मंजूर विकास आराखड्यानुसार प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे महामेट्रोने रस्ते विकासाचे नियोजन विचारात घेऊन प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचा उन्नत मार्गिकेप्रमाणेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा,” असे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांचे अंडरग्राउंड मेट्रो प्रवासाचे स्वप्न भंगणार? पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; ‘या’ मार्गिकेला स्पष्ट नकार!

Thursday, 26 November 2026, 22:12

महाराष्ट्रात हुडहुडी वाढणार! अक्वान चक्रीवादळाचा प्रभाव ओसरताच उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे आगमन; ‘या’ जिल्ह्यांत पारा थेट १० अंशांच्या घरात!

Thursday, 26 November 2026, 22:11

देव तारी त्याला कोण मारी! धरणात बोट उलटल्यानंतर ३ भावांचा जगण्यासाठी संघर्ष; मदतीसाठी आरडाओरड अन् थोडक्यात बचावले….

Thursday, 26 November 2026, 21:33

पिंपरी-चिंचवड हादरलं! मोशीतील शेततळ्यात मामा-भाच्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

Thursday, 26 November 2026, 20:49

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट अन् थारचालकाचा थरार! पोलिसाच्या अंगावर गाडी घालून ५० फूट फरफटत नेलं, नंतर घटनास्थळावरून पसार…

Thursday, 26 November 2026, 19:58

पुणेकरांची तहान भागवण्यासाठी बांधलं जाणार स्वतंत्र नवं धरण! मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीनंतर ‘या’ ३ संभाव्य जागांचा शोध सुरू!

Thursday, 26 November 2026, 18:52
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp