Friday, August 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आलिशान फॉर्च्युनरमधून दोन पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; नऱ्हे पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 14 August 2026, 16:43

विशाल शिंदे

पुणे: आलिशान फॉर्च्युनर कारमधून अग्नीशस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नऱ्हे पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत सुमारे ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नऱ्हे पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक कारवाईतील ही आणखी एक धडाकेबाज कामगिरी मानली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय घाडगे, पोलीस अंमलदार निलेश भोरडे, प्रणिल मेस्त्री, कार्तिक कोंडे, देवा चव्हाण, धुळा गारळे आणि राजू तोरे हे पथक पेट्रोलिंग करीत होते.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक विजय घाडगे, पोलीस अंमलदार निलेश भोरडे, कार्तिक कोंडे आणि सुनील चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही संशयित व्यक्ती चारचाकी वाहनातून अग्नीशस्त्रे घेऊन फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तातडीने पारी कंपनी चौक ते उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, अयोध्या प्युअर व्हेज, बेनकर वस्ती, धायरी, पुणे येथे पोहोचले.

 

पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता रस्त्याच्या कडेला MH 14 CK 0004 क्रमांकाची फॉर्च्युनर कार संशयास्पदरीत्या थांबलेली आढळली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये दोन इसम आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे (वय २६, रा. महर्षी नगर, स्वारगेट, पुणे) आणि अथर्व ऊर्फ आप्पा उमाकांत सणस (वय २३, रा. शितळादेवी चौक, गुरुवार पेठ, पुणे) अशी सांगितली.

पंचांसमक्ष दोन्ही संशयितांची अंगझडती तसेच वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनाच्या आर्मरेस्टसमोरील भागात एक पिस्तूल आणि त्याच्या मॅग्झिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे अग्नीशस्त्र आणि काडतूस जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर कारही पोलिसांनी जप्त केली.

यानंतर आरोपी पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपासाच्या आधारे अधिक चौकशी केली. या तपासादरम्यान आणखी एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले. अशाप्रकारे दोन्ही आरोपींकडून एकूण दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

या कारवाईत अग्नीशस्त्रे, जिवंत काडतुसे आणि फॉर्च्युनर कार असा एकूण ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून, ही शस्त्रे त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने बाळगली होती, त्यांचा यापूर्वीच्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, तसेच या शस्त्रांचा पुरवठा कोणी केला याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय घाडगे करीत आहेत.

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजय घाडगे यांच्यासह पोलीस अंमलदार पांडुरंग पवार, निलेश भोरडे, प्रणिल मेस्त्री, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, राजू तोरे, नितीन वाघमारे, धुळा गारळे, गोविंदराव कपाटे, स्वप्नील सूर्यवंशी आणि सुमित जगझाप यांच्या पथकाने सहभाग घेतला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित यांच्या ३५ वर्षांच्या निष्कलंक सेवेला सलाम! न्यायालयीन कामकाजातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शासनाकडून ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’जाहीर

Friday, 14 August 2026, 18:47

दोन मुली झाल्या म्हणून टोमणे अन् मदतीच्या पैशांवर डल्ला! मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात मोठे वळण; सासरच्यांवर गुन्हा दाखल

Friday, 14 August 2026, 18:14

आलेगाव पागा प्रकरण! एकाच दिवशी जिल्हा उपनिबंधकांचे दोन आदेश; ‘या आदेशांचा नेमका अर्थ काय?’ शेतकऱ्यांचा सवाल – उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Friday, 14 August 2026, 18:03

‘आई त्याने माझी पॅन्ट काढली आणि..’ पुण्यात विकृतीचा कळस; ६ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, घरी बोलावून धमकी दिली अन्….

Friday, 14 August 2026, 17:28

फुरसुंगीत ताडी विक्रीचा पर्दाफाश! ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Friday, 14 August 2026, 17:08

आलिशान फॉर्च्युनरमधून दोन पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; नऱ्हे पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई

Friday, 14 August 2026, 16:43
Next Post

फुरसुंगीत ताडी विक्रीचा पर्दाफाश! ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.