Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलीस भरतीत घोटाळा! बनावट प्रमाणपत्र अन् १९ जणांवर होणार कारवाई; प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 16 October 2026, 14:32

पुणे : राज्य सरकारच्या खेळाडूंसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षणाचा गैरवापर करून बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे शहर पोलीस दलात भरती झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुराश आणि ड्रॅगनबोट या खेळांची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी १९ उमेदवारांवर कारवाई करण्यात येत आहे. या सर्व उमेदवारांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

या १९ उमेदवारांपैकी १० जणांना अद्याप सेवेत रुजू करून घेण्यात आले नव्हते. तर उर्वरित ९ जणांना विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, बनावट प्रमाणपत्रांचे प्रकरण समोर आल्यानंतर या नऊ जणांनाही प्रशिक्षण केंद्रांतून तातडीने परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस भरती प्रक्रियेतील क्रीडा प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पुणे शहर पोलीस दलाच्या २०२४-२६ मधील भरती प्रक्रियेदरम्यान बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर झाल्याची माहिती एका सजग नागरिकाने पोलिसांना दिली होती. त्यासोबत पुरावेही सादर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

२०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत कुराश खेळाच्या प्रत्यक्ष स्पर्धा आयोजित न करताही त्या झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे. या नोंदींच्या आधारे बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रमाणपत्रांचा वापर करून संबंधित उमेदवारांनी पोलीस भरतीत क्रीडा आरक्षणाचा लाभ घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

 

या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती आहे. संबंधित केंद्रांवर बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याचा आरोप आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित गैरप्रकारामागे मोठे जाळे असल्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.

कुराश खेळाच्या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या १९ संघटनांची माहिती गुन्हे शाखेने संकलित केली आहे. या संघटनांशी संबंधित संशयित पदाधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. बनावट प्रमाणपत्रे तयार करणे, त्यांचा वापर करणे किंवा या प्रक्रियेत मदत करणे यामध्ये इतर व्यक्तींचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणामुळे क्रीडा आरक्षणाच्या आधारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत प्रमाणपत्रांची सत्यता तपासण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आधी म्हणाले लोहगड पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला अन् आता कुंटुंबीय पलटले; आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा, नेमकं प्रकरण काय?

Friday, 16 October 2026, 14:46

पुण्यात गोळीबाराचा भयंकर थरार! जुन्या भांडणाचा राग अन् थेट पाठीत घातली गोळी; पोलिसांनी फक्त ८ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Friday, 16 October 2026, 14:37

पुणे पोलीस भरतीत घोटाळा! बनावट प्रमाणपत्र अन् १९ जणांवर होणार कारवाई; प्रकरण काय?

Friday, 16 October 2026, 14:32

संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! सरन्यायाधीशांवरील ‘ते ‘वक्तव्य भोवलं; थेट मागितली माफी, म्हणाले…..

Friday, 16 October 2026, 14:28

नोकरी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! पगारात 9.1% वाढीचा अंदाज, कोणत्या क्षेत्रात मिळणार सर्वाधिक पैसा? वाचा

Friday, 16 October 2026, 13:53

शिरूरच्या उच्चभ्रू आनंद सोसायटीत गोळीबाराचा थरार! चिमुकल्या मानवीचा चोराशी थेट मुकाबला; वडिलांच्या पायावर गोळी झाडून चोर पसार!

Friday, 16 October 2026, 13:22
Next Post

पुण्यात गोळीबाराचा भयंकर थरार! जुन्या भांडणाचा राग अन् थेट पाठीत घातली गोळी; पोलिसांनी फक्त ८ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp