Wednesday, May 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Purandar Airport: ‘या’ सात गावांमध्ये उभारलं जाणार पुणे पुरंदर विमानतळ; कोणती गावं जाणून घ्या…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 September 2025, 19:24
Purandar Airport: Pune Purandar Airport will be built in 'these' seven villages; Know which villages...

Photo- Social Media

पुणे : पुरंदर विमानतळ (Purandar Airport) प्रकल्पासाठी सातही गावांतील शेतकऱ्यांकडून संमती देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होत आहे. जिल्हा प्रशासनाने (Pune News) दिलेल्या मुदतवाढीनंतर मंगळवारपर्यंत तब्बल 94% शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे. येत्या शुक्रवारपासून (26 सप्टेंबर) जमिनीची मोजणी सुरू होणार असून, ती 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे.

पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने 25 ऑगस्टपासून शेतकऱ्यांचे समुपदेशन करून संमती घेण्यास सुरुवात केली. 18 सप्टेंबरपर्यंत 90% शेतकऱ्यांनी संमती दिली होती. मात्र काही शेतकऱ्यांनी व सरपंचांनी मुदतवाढीची मागणी केल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

 

गेल्या महिनाभरापासून भूसंपादन उपविभागीय समन्वयक आणि अधिकारी सासवड येथे तळ ठोकून शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. या प्रयत्नांमुळे संमती प्रक्रियेला गती मिळाली आहे. आतापर्यंत 2,700 एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकरी तयार झाले आहेत. विमानतळासाठी एकूण सुमारे 3,000 एकर जमिनीची गरज असून, त्यापैकी मोठा भाग निश्चित झाला आहे.

या सात गावांत सरकारच्या मालकीची जवळपास 200 एकर जमीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मिळालेल्या 2,700 एकरांसह एकूण 2,900 एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध होणार असल्याचे दिसत आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, “पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत 94% शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे. शुक्रवारपासून मोजणीची प्रक्रिया सुरू करू. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या दर निश्चितीसाठी प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर संमती दिलेल्या जमिनीच्या संपादन प्रक्रियेला सुरुवात होईल.”

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ‘आंदेकर’ टोळीचा पुन्हा थरार! आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या

Wednesday, 20 May 2026, 10:59

दोन प्रेयसी अन् एक प्रियकर! पुण्यात तरुणीने केली आत्महत्या अन् 4 महिन्यांनी समोर आलं सत्य!

Wednesday, 20 May 2026, 10:47

दौंडकरांसाठी मोठी गूड न्यूज! बंद पडलेलं ‘RTO’ लायसन्स शिबीर पुन्हा होणार सुरू; आमदार राहुल कुल यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

Wednesday, 20 May 2026, 10:05

कात्रज येथील ब्यूटी पार्लरमध्ये शिजला ‘नीट’ पेपरफुटीचा कट; चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

Wednesday, 20 May 2026, 9:51

पुण्यात उन्हाचा कडाका वाढला; दुपारनंतर मात्र ‘वरुणराजा’ दिलासा देण्याची शक्यता

Wednesday, 20 May 2026, 9:30

Today’s Horoscope: गणपती बाप्पाची कृपा! आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Wednesday, 20 May 2026, 9:23
Next Post
Beed Flood: Immediate assistance will be provided to affected farmers; Environment Minister Pankaja Munde

Beed Flood: बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाणार; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.