Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इराण–इस्रायल युद्धाची झळ; उरुळी कांचन येथील घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत तर भिगवण व यवत येथे घरगुती गॅससाठी रांगा, व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 March 2026, 12:04

उरुळी कांचन, (पुणे) : इराण आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल का, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन परिसरात नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू असल्याची माहिती स्थानिक गॅस एजन्सीकडून देण्यात आली आहे.

 

उरुळी कांचन येथील सुरानंद एचपी गॅस एजन्सीचे संभाजी बापू कांचन यांनी सांगितले की, व्यावसायिक वापराच्या काही सिलिंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाला असला तरी घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सध्या परिसरात गॅसचा तुटवडा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सिलिंडर बुक करत असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे उरुळी कांचन आणि आसपासच्या भागातून रोज 250 ते 300 गॅस बुकिंग होत होती. पण सध्या ही संख्या वाढून सुमारे 800 ते 900 पर्यंत पोहोचली आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही ठिकाणी तात्पुरता ताण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भिगवण आणि यवत परिसरातही गॅसबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी नागरिक पहाटेपासून गॅस एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कडक उन्हातही अनेक नागरिक तासन्तास सिलिंडर मिळण्याची वाट पाहत उभे राहत आहेत.

गॅस एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी 21 ऐवजी 25 दिवसांनंतर करता येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक लवकरात लवकर सिलिंडर रिफिल करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पुरवठा साखळीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याने वितरणात थोडा विलंब होऊ शकतो.

व्यावसायिक गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने काही हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हॉटेल व्यावसायिक ओंकार रानवडे यांनी सांगितले की, बुकिंग करूनही व्यावसायिक गॅस मिळत नाही. ही स्थिती आणखी काही दिवस राहिली तर हॉटेल बंद ठेवावे लागेल. महागाईमुळे आधीच अडचणीत असलेल्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

बुकिंग करूनही व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नाहीत. आणखी दोन ते तीन दिवस गॅस उपलब्ध नाहीत झाले तर हॉटेल बंद करून घरी बसावे लागेल. अगोदरच खाद्य तेल व वाढती महागाई यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हॉटेल बंद झाले तर कामगारांवरही उपासमारीची वेळ येणार आहे,

ओंकार रानवडे, हॉटेल व्यावसायिक, हॉटेल सोनाई व्हेज

 

पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ?

गॅसचा तुटवडा कायम राहिला आणि वेळेत सिलिंडर उपलब्ध झाले नाहीत तर अनेक कुटुंबांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र ग्रामीण भागात वीजपुरवठ्याच्या अडचणी लक्षात घेता काही महिलांवर पुन्हा एकदा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येऊ शकते. आधुनिक सुविधांच्या युगात पुन्हा धुराच्या चुलीकडे वळण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा गृहिणींकडून व्यक्त होत आहे.

 सौ. शुभांगी जगदाळे, तक्रारवाडी 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

Nashik Crime : "ये हुई ना लूट!" 'तिच्या' सौंदर्यावर भाळला श्रीमंत तरुण; तरुणीने असा लावला 53 लाखांचा चुना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.