Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील प्रकार! ‘माझे वडील आजारी आहेत’ डॉक्टरला व्हिजिटसाठी घरी बोलावलं; गळ्याला चाकू लावला, बोट कापलं अन्..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 January 2026, 17:22
Pune Crime: Types in Pune! 'My father is sick' Doctor called home for visit; Knife held to throat, finger cut off and..

पुणे: आजारी वडिलांची तपासणी (Pune Crime) करण्यासाठी होम व्हिजिटला (Pune News) बोलावून दोन चोरट्यांनी डॉक्टरांवर चाकूचा धाक दाखवत मारहाण करून लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पुणे-सातारा रोडवरील अथर्व फरिहाज बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री सव्वा 9 वाजण्याच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

 

याप्रकरणी धनकवडी परिसरात राहणाऱ्या 49 वर्षीय डॉक्टरांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी डॉक्टर हे एमबीबीएस असून धनकवडी येथे त्यांचे क्लिनिक आहे. ते रुग्णांसाठी होम व्हिजिटही करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांना एका व्यक्तीने फोन करून वडील आजारी असल्याचे सांगितले आणि पुणे-सातारा रोडवरील अथर्व फरिहाज बिल्डिंगमध्ये तपासणीसाठी येण्यास सांगितले. डॉक्टर रात्री ठरलेल्या वेळेत इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले असता दोन व्यक्ती तिथे उपस्थित होत्या. त्यापैकी एकाने डॉक्टरांच्या गळ्याला चाकू लावून धमकी दिली आणि डाव्या हाताच्या बोटाला चाकू मारून जखमी केले. दुसऱ्या आरोपीने डॉक्टरांची मोपेड, मोबाईल सॅक आणि सॅकमधील 30 हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 1 लाख रुपये किमतीचा 700 ग्रॅम वजनाचा चांदीचा जग जबरदस्तीने चोरून नेला.

प्राथमिक तपासात चोरट्यांनी जस्ट डायलवरून होम व्हिजिटसाठी उपलब्ध असलेल्या डॉक्टरांची माहिती घेतली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून डॉक्टरांना होम व्हिजिटसाठी बोलावून लूट केल्याची शक्यता आहे. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी परिसरात अंधार असल्याने फुटेजमध्ये फारसे स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सद्दाम फकीर करीत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56
Next Post
Pune News: MIT ADT University receives ‘Sword of Honor’ award

Pune News: एमआयटी एडीटी विद्यापीठाला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.