Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुणे रेल्वे स्थानक हादरलं! 4 वर्षांच्या चिमुकलीला फलाटावरून पळवलं अन्…; सीसीटीव्हीमध्ये नराधमाचा ‘तो’ प्रताप कैद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 February 2026, 11:40

Pune Crime : पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेच्या प्रतीक्षेत फलाटावर झोपलेल्या एका कामगार कुटुंबातील चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण (Kidnapping) करून तिच्यावर अत्याचार (Torture) करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर घडली. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या असून पीडित मुलीची सुटका केली आहे. Pune Crime

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. हे कुटुंब मध्य प्रदेशातील खांडवा येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर रेल्वेची वाट पाहत हे सर्वजण फलाटावरच झोपले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास मुलीचे वडील अचानक जागे झाले तेव्हा त्यांना आपली मुलगी शेजारी दिसली नाही. त्यांनी तातडीने आजूबाजूला आणि संपूर्ण स्थानकावर शोध घेतला, मात्र मुलगी कोठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली.

घटना सीसीटीव्हीत कैद 

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये एक तरुण त्या चिमुकलीचा हात धरून तिला फलाटाच्या शेवटच्या टोकाला निर्जन ठिकाणी घेऊन जाताना स्पष्ट दिसला. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सकाळी सहाच्या सुमारास पार्सल गेट जवळून आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महेश यादव असून त्याचे वय (25) आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी असून पीडित कुटुंबाशी त्याची आधीपासून ओळख होती, असे तपासात समोर आले आहे.

खाऊचे आमिष दाखवून मुलीचे अपहरण

आरोपीने खाऊचे आमिष दाखवून मुलीला सोबत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले असून तिला पोटात दुखत असल्याने उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, अपहरण आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Mumbai-Pune Expressway: मोठी घोषणा! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 32 तास रखडलेल्या प्रवाशांच्या पदरात पडणार 5.2 कोटी; पाहा तुमच्या खात्यात कधी येणार पैसे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.