Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालक व अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश; तब्बल 30 मोबाईलसह 3,70,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 7 October 2025, 18:13
Pune Crime: Gang of rickshaw drivers and minors robbing passengers in Pune busted; 30 mobile phones and valuables worth Rs 3,70,200 seized

Photo-Social Media

अमित मुंडीक

 

पुणे : प्रवाशांना (Pune Crime) रात्रीच्या वेळी रिक्षामध्ये बसवून (Pune News) निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका रिक्षाचालकासह दोन विधीसंघर्षित बालकांना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने अनेक प्रवाशांचे मोबाईल आणि रोकड लुटल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 3,70,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात तब्बल 30 मोबाईल फोनचा समावेश आहे.

वानवडी पोलिसांच्या तपास पथकाला माहिती मिळाली की, हडपसर येथील नवीन म्हाडा कॉलनी जवळील वॉशिंग सेंटर शेजारील कच्च्या रस्त्यावर काही इसम रिक्षामध्ये थांबून चोरीचे मोबाईल विक्रीसाठी ठेवत आहेत. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता, नमूद रिक्षा (क्र. MH-12-VB-9420) आढळून आली. पोलिसांनी कारवाई केल्यावर आरोपींनी रिक्षा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये फैजान मोहम्मद गौस शेख (रा. उरुळी देवाची, पुणे) आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. तपासात आरोपींकडून ग्रे कलरचा विवो मोबाईल हॅन्डसेट आणि रिक्षाच्या डिक्कीत लपवलेला चाकू जप्त करण्यात आला.

चौकशीत फैजान शेख याने कबुली दिली की, दोन महिन्यांपूर्वी पैशांची गरज असल्याने त्यांनी रिक्षामधून पुणे स्टेशनवर प्रवासी उचलले. प्रवाशाला शिवाजीनगर येथे नेण्याचे सांगून त्याला रिक्षेत बसवले आणि टर्फ क्लब, रेसकोर्स रोड, भैरोबानाला येथे निर्जन ठिकाणी नेले. तेथे चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि रोकड लुटून घेतली.

या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि 80,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात आरोपींकडून आणखी 29 मोबाईल मिळाले ज्यांची किंमत 2,90,100 रुपये इतकी आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूण 30 मोबाईल हॅन्डसेटसह 3,70,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमूद आरोपीविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात गु.र.नं. 306/2025, भारतीय न्याय संहिता कलम 309(4) आणि 3(5), गु.र.नं. 400/2025, भारतीय न्याय संहिता कलम 309(4) आणि 3(5), तसेच गु.र.नं. 290/2021, भादंवि कलम 379 या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलिसांची कारवाई

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे तसेच महिला पोलीस अंमलदार सुजाता फुलसुंदर यांचा समावेश होता.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Maharashtra Cabinet Decisions: 9 important decisions of the state cabinet including amendments to the Partition Act: Know the details...

Maharashtra Cabinet Decisions: तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेसह राज्य मंत्रिमंडळाचे 9 महत्त्वाचे निर्णय: जाणून घ्या सविस्तर... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.